मिटणापूरची उर्दू शाळा कोसळण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: August 5, 2015 00:14 IST2015-08-05T00:14:37+5:302015-08-05T00:14:37+5:30

शहरालगतच्या मिटणापूर येथील उर्दू शाळा धोकादायक स्थिती असून, या शाळेत साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो.

On the way to Mithanpur's Urdu school collapse | मिटणापूरची उर्दू शाळा कोसळण्याच्या मार्गावर

मिटणापूरची उर्दू शाळा कोसळण्याच्या मार्गावर

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शाळेत सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार
बाभूळगाव : शहरालगतच्या मिटणापूर येथील उर्दू शाळा धोकादायक स्थिती असून, या शाळेत साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे या शाळेची इमारत निर्लेखित करावी असा प्रस्ताव शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे पाठविला. परंतु या प्रस्तावाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.
मिटणापूर येथे सातवीपर्यंत शाळा आहे. मुख्याध्यापकासह चार शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेच्या दोन खोल्या पडक्या असून, एक पिल्लर केव्हा कोसळेल याचा नेम नाही. अशा स्थिती बाभूळगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे शाळेच्या धोकादायक खोल्या पाडण्याचा प्रस्ताव दिला. परंतु उपयोग झाला नाही. सदर शाळेच्या छपरावरील टीनपत्रे २०१३ मध्ये वादळात उडून गेली होती. याबाबतही शिक्षण विभागाला कळविण्यात आले, परंतु अद्यापपर्यंत टीनपत्रे टाकण्यात आले नाही. त्यामुळे या धोकादायक खोलीत ज्ञानार्जन करावे लागते. पडक्या खोलीत भेगा पडल्या असून, साप, विंचू, सरडे, उंदीर आदी प्राणी निघणे नित्याची बाब झाली आहे. केंद्रप्र्रमुखाच्या भेटीतही हा प्रकार निदर्शनास आणून दिला, परंतु उपयोग होत नाही. अशा स्थिती विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the way to Mithanpur's Urdu school collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.