शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा वीज बिल, अधिकाऱ्यांचे हातवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:15 IST

थकीत बिलापोटी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद स्थायी समिती : विरोधकांचा आवाज क्षीण

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : थकीत बिलापोटी ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. यावर स्थायी समितीच्या बैठकीत काही तोडगा निघेल, अशी अपेक्षा होती. परंतु अधिकाऱ्यांनी कुठलाही उपाय नसल्याची असमर्थता दर्शवित वीज बिलावरून हात वर केले. त्यामुळे या बैठकीत वीज बिलाचा प्रश्न कायम राहिला. तर या बैठकीत विरोधकांनी मानपानासाठी उठविलेला आवाज पाणीटंचाई उपाययोजनांच्या प्रश्नांवर क्षीण झाल्याचा दिसून आला.यवतमाळ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. स्थायी समितीच्या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न पेटणार असा कयास होता. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांकडे २५ कोटी चार लाख रुपये वीज बिलाचे थकीत आहे. ऐन उन्हाळ्याच्या काळात वीज वितरणने कारवाईचा धडाका सुरू केला. १३३१ पाणीपुरवठा योजनांपैकी ६१४ योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यात यवतमाळ विभाग २८८, पुसद विभाग २०१ आणि पांढरकवडा विभाग १२५ पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीकडे वीज बिल भरण्याची आर्थिक तरतूद नाही. दुसरीकडे वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे अनेक गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हाच मुद्दा स्थायी समितीत सदस्यांनी मांडला. मात्र यावर अधिकाºयांकडून कुठलाही उपाय नसल्याचे सांगण्यात आले. १४ व्या वित्त आयोगातील पैसा वीज बिलासाठी खर्च करू नये, असे शासन आदेश असल्याचे अधिकाºयांनी या बैठकीत सांगितले. ग्रामीण जनता पाणीटंचाईने होरपळत असताना कोणताही ठोस निर्णय या बैठकीत होऊ शकला नाही. अधिकाऱ्यांनी हात वर केल्याने हा प्रश्न कायमच राहिला. केवळ शासनाकडे प्रस्ताव पाठवून वीज जोडणीबाबत पाठपुरावा करू असे नेहमीचे उत्तर सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी दिले.स्थायी समितीच्या बैठकीत दलित वस्ती निधीचा प्रश्न उपस्थित झाला. मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहत असून पंचायत समितीकडून हा निधी परत पाठविला जात असल्याचे सांगण्यात आले. या गंभीर प्रकरणाबाबत सभापतींनी आक्षेप घेत तत्काळ चौकशी समिती नेमून कारवाई करा, असे निर्देश दिले. यासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १४५ हौदांचे बांधकाम, चार उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. दीड लाख मेट्रिक टन चाऱ्याची तूट असल्याचे कृषी संवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा, खोल्या, निर्लेखनाचा मुद्दाही काही सदस्यांनी मांडला. दारव्हा तालुक्यातील तपोना व वगळ येथील अंगणवाडी सेविका २० वर्षांपासून ५०० रुपये मानधनावर राबत आहे. त्यांच्या अर्जाकडे महिला बालकल्याण विभागाने लक्ष दिले नाही, असा आरोप सदस्यांनी केला. यानंतर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेत विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेण्याबाबत ठराव देण्यात आला. पाणीटंचाईवरून सुरू झालेली ही सभा मानपानावर येऊन थांबली. विरोधकांनी मानपानासाठी उठविलेला आवाज टंचाईबाबत मात्र क्षीण झाला होता. सोमवारी झालेली सभा केवळ औपचारिकताच ठरली.सभेत श्रद्धांजलीचेही सौजन्य नाहीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन झाले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेल्या काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांना या लोकनेत्याचा विसर पडला. काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही या लोकनेत्याला साधी श्रद्धांजली अर्पण करण्याचे सौजन्यही दाखविले नाही.