शहराला दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 10:04 PM2018-10-22T22:04:30+5:302018-10-22T22:05:06+5:30

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Water supply to the city | शहराला दूषित पाणीपुरवठा

शहराला दूषित पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांचा मोर्चा धडकला : नगरसेवकांचे नेतृत्व, प्राधिकरणाला विचारला जाब

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. नळाचे निश्चित दिवस ठरले नसून अतिशय दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरात साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराला जीवन प्राधिकरणाची यंत्रणा जबाबदार असून याचा जाब विचारण्यासाठी नगरसेवक व महिलांनी सोमवारी दुपारी जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली.
शहरात मोठ्याप्रमाणात डेंग्यूची, टायफाईडची साथ सुरू आहे. यात आणखी भर घालण्याचे काम जीवन प्राधिकरण दूषित पाणीपुरवठ्यातून करत आहे. कधी नव्हे तो यवतमाळात कॉलराची लागण झाली. डायरियाचे रुग्ण आताही वाढत आहे. जीवन प्राधिकणर चक्क मानवी आरोग्याशी खेळण्याचे काम करत आहे. अनेक भागात आठ ते दहा दिवसानंतरही नळ येत नाही. पाणीपुरवठ्याचे निळोणा आणि चापडोह हे दोन्ही प्रकल्प तुडूंब भरलेले असताना नियमित नळ येत नाही. कधी तरी आलेल्या नळातून हातही लावता येणार नाही, असे पाणी येत आहे. ही समस्या शहरातील सर्वच भागात आहे.
दूषित व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे संतापलेल्या बांगरनगर, गिरीनगर, विठ्ठलवाडी, छत्रपतीनगर, अभिनव कॉलनी, संदीप टॉकीज परिसर, साईनगर, कामगारनगर, वंजारी फैल, बुटले ले-आऊट आदी परिसरातील महिलांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी परिसरातील नगरसेवक विशाल पावडे, उध्दवराव साबळे, कोमल कार्तिक ताजने, साधना काळे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन नियमित व शुध्द पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला.
आरोग्याशी खेळखंडोबा
दूषित पाणीपुरवठा करून जीवन प्राधिकरण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे. पिण्यायोग्य तर सोडाच दैनंदिन वापरायोग्य पाणी नळातून येत नाही. उन्हाळ््यापासून कोलमडलेले पाणीपुरवठ्याचे नियोजन अजूनही सुरळीत झाले नाही. शहरात ठिकठिकाणी नळाची मुख्य पाईपलाईन लिक आहे. हजारो लिटर पाणी वाहून जात आहे.

Web Title: Water supply to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.