शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३९ गावांना टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:21 IST

अपुरा पाऊस आणि तळाला गेलेल्या जलस्रोतामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ३९ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक नेरमध्ये : ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली, प्रशासनाच्या उपाययोजना तोकड्या लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : अपुरा पाऊस आणि तळाला गेलेल्या जलस्रोतामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील ३९ गावांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक सहा टँकर नेर तालुक्यात सुरू आहे. आगामी काळात जिल्ह्यातील टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्केच पाणी झाले. त्यामुळे हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईची चाहूल लागली होती. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. १४ कोटी रुपयांचा कृती आराखडाही तयार केला. मात्र गावागावातील पाणीटंचाईने आता उग्ररुप धारण केले आहे. जिल्ह्यातील ३९ गावात कोणतेच जलस्रोत नसल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक सहा टँकर नेर तालुक्यात सद्यस्थितीत सुरू आहे. तालुक्यातील खरडगाव झोंबाडी, सातेफळ, अजंती, घुई, चिकणी डोमगा या गावात दररोज टँकर पोहोचत आहे. आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, चिमटा, खडका, पाळोदी, बाभूळगाव तालुक्यातील सारफळी, फत्तेपूर, दारव्हा तालुक्यातील तोरनाळा, तेलगव्हाण, करजगाव, कोहळा, कळंब तालुक्यातील गणेशवाडी, पांढरकवडा तालुक्यातील सुकळी पोड, उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव, वणीच्या पेटूर, नायगाव, सावंगी, यवतमाळातील पांढरी, धानोरा, इथोरी, जांबुळणी, लोहारा, पुसद तालुक्यातील बाळेवाडी, मुंगसाजीनगर, पन्हाळा, म्हैसमाळ, मारवाडी, महागावातील टेंभुरधरा, फुलसावंगी आणि घाटंजी तालुक्यातील ताडसावळी, पारवा, टिपेश्वर पुनर्वसन, चांदापूर, पंगडी या गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मारेगाव आणि दिग्रस या दोन तालुक्यात अद्यापपर्यंत टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली नाही.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. जिल्ह्यातील १८६ गावातील १८६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. त्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. त्या खालोखाल दारव्हा तालुक्यात ३२, आर्णी आणि यवतमाळ तालुक्यात २२ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.प्रकल्पांमध्ये केवळ १८.७१ टक्के पाणीयवतमाळ जिल्ह्यात तीन मोठे, सात मध्यम आणि ९१ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये २०२.७८ दलघमी म्हणजे केवळ १८.७१ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पांमध्ये अपुरा जलसाठा असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्ह्यातील पूस प्रकल्पात १५.६४, अरुणावती प्रकल्पात ८.८२, बेंबळा प्रकल्पात १४.४८ टक्के जलसाठा आहे. तर अडाण प्रकल्पात १७.३२, नवरगाव २४.५२, गोखी ८.५५, वाघाडी १०.५५, सायखेडा ५०.४४, अधरपूस ३२.७७, बोरगाव ८.१७ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील १०१ प्रकल्पांची संकल्पीत पाणी साठा क्षमता १०८३.७७ दलघमी असून या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या २०२.७८ दलघमी पाणीसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी