शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

कळंबकरांना पाण्याचे ‘नो टेन्शन’, वर्धा नदी भर उन्हाळ्यातही तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

कळंब शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो, तर दुसरीकडे जुन्या वस्तीमधील ३० वर्षांपूर्वीच्याच नळयोजनेने पाणीपुरवठा केला जात आहे. ही नळयोजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी लिकेज होतात. त्यामुळे नव्याने कळंब शहरासाठी    नळयोजना करण्याची मागणी केली जात आहे.  

गजानन अक्कलवारलोकमत न्यूज नेटवर्ककळंब : वर्धा नदीला मुबलक पाणी आहे. तालुक्यातील इतर तलावांमध्येही पाण्याचा मोठा साठा आहे. जून अखेरपर्यंत प्रकल्पात पाणी राहणार असल्याने शहरासह तालुक्यातील गावांना पाणी टंचाईवर मात करणे सोपे जाणार आहे. कळंब शहरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. विजेच्या लपंडावामुळे अनेकदा पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येतो, तर दुसरीकडे जुन्या वस्तीमधील ३० वर्षांपूर्वीच्याच नळयोजनेने पाणीपुरवठा केला जात आहे. ही नळयोजना कुचकामी ठरत आहे. जागोजागी लिकेज होतात. त्यामुळे नव्याने कळंब शहरासाठी    नळयोजना करण्याची मागणी केली जात आहे.  पाच-सहा वर्षांपूर्वी तालुक्यामध्ये अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. परंतु आता एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. इंधन विहिरीची दुरुस्ती करणे, विहिरीचे खोलीकरण करणे, सार्वजनिक विहिरीची नव्याने निर्मिती करणे आदी उपाययोजना पंचायत समिती स्तरावरून गावपातळीवर करण्यात आल्या आहे.

टंचाई नसली तरी    कृती आराखडा तयार तालुक्यातील एकाही गावात आतापर्यंत तरी टँकरने पाणीपुरवठा करावा लागलेला नाही. जलस्रोतांच्या पाण्याची पातळी कमी होत असले, तरी सद्यस्थितीत पाणीटंचाईची झळ बसलेली नाही. असे असे तरी प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

 कळंबला चार ठिकाणावरून पाणीपुरवठा 

- कळंब शहरातला वर्धा नदी, गायसागर, चक्रवती नदीवरील विहीर, महावीर नगरमधील नळयोजनेची विहीर या चार ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या वर्धा नदीला मुबलक पाणी आहे. त्यामुळे मुख्य नळयोजनेला पाण्याची कमतरता पडणार नाही.

- तीन महत्त्वपूर्ण जलस्रोतांना ‘चार्ज’ करण्यासाठी दत्तापूर व घोटी तलावाचे पाणी सोडले जाणार आहे. वर्धा नदीच्या पात्रामध्ये खोदण्यात आलेल्या विहिरीतून कळंब शहराला पाणीपुरवठा केला जातो.

- वाढलेली लोकसंख्या व जीर्ण झालेली नळयोजनेला लक्षात घेता बेंबळा धरणावरून नवीन नळयोजना सुरू करण्याची कळंबवासीयांची मागणी आहे. यावर्षी पाणीप्रश्न निर्माण झाला नसला तरी भविष्यातील उपाययोजना म्हणून हा प्रयोग अपेक्षित आहे.

नियमित पाणीपुरवठ्याचा प्रयत्न

शहरासाठी चार ठिकाणावरून पाणीपुरवठा केला जात आहे. अनेकदा विजेअभावी पाणीपुरवठा खंडित होतो.  सध्या तीन-चार दिवसाआड पाणी सोडले जात आहे. चक्रवती नदीला प्रकल्पाचे पाणी सोडून नदीकाठावरील सर्व जलस्रोतांच्या पाण्याची पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.  - नंदू परळकर, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कळंब

कळंब तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याचे आणि जनावरांसाठी पाणी उपलब्ध आहे. काही गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.- सुभाष मानकर, गटविकास अधिकारी, कळंब

 

टॅग्स :Waterपाणीriverनदी