शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महावितरणच्या प्रतापाने हरभरा पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:22 IST

जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला.

ठळक मुद्देढाणकी-साखरा : उपकेंद्रावरून वेळी-अवेळी वीज पुरवठा, शेतकऱ्यांचे गणित बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला.अस्मानी संकटासह जाणीवपूर्वक दिल्या जाणाऱ्या सुलतानी संकटामुळे श९तकरी त्रस्त आहे. यातून अन्नदात्याचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे. ढाणकी, साखरा येथील वीज केंद्रावरून पुरवठा होणाऱ्या गावातील शेतकरी अडचणीत सापडले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले जाते. यातून अवेळी आलेल्या विजेमुळे रात्रभर मोटरपंप सुरू राहिल्याने शेकडो हेक्टरवरील हरभरा पाण्याखाली गेला.या संदर्भात विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाºयाशी संपर्क साधला असता ढाणकी व साखरा येथील दोन्ही केंद्रांच्या जबाबदार अभियंत्यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी मुजोरी कायम ठेवली. या दोन्ही केंद्रावरून सातत्याने शेतकऱ्यांना मानासिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. या परिसरात वीज कपात नियमांतर्गत शेतीसाठी केवळ ८ तास वीज पुरवठा केला जातो. मात्र हा पुरवठा कमी दाबाचा असतो. बहुतांश शेतकºयांनी या खंडित वीज समस्येमुळे मोटरपंपास आॅटो स्विच बसविले. मात्र कधीही वीज येत असल्याने संपूर्ण शेत पाण्याखाली जात आहे.आॅटो स्वीचमुळे शेतात साचले पाणीचातारी-मानकेश्वर फिडरवर सोमवार ते गुरुवार, शुक्रवार ते रविवार या काळात वेगवेगळ्या वेळी वुज पुरवठा होतो. मात्र वेळापत्रकाबाबत पूर्वसूचना न देताच अचानक बदल केला जातो. गुरुवार, ३ जानेवारीला १0.३0 पासून ते सकाळी ८.३0 वाजतापर्यंत तीन फेज वीज पुरवठा सुरू होता. निश्चित वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांनी ओलिताचे नियोजन केले होते. मात्र महावितरणने अचानक केलेल्या वीज पुरवठ्याने आॅटो स्विचमुळे रात्रीच मोटरपंप सुरू झाले अन् शेतात सर्वत्र पाणीच पाणी पसरले. यामुळे अनेक शेतकºयांच्या हरबरा, गहु, ज्वारी, ऊस पिकात पाणी साचले. शिवाय लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. संबंधित लाईनमनलाही या बदलाची माहिती नव्हती. सहाय्यक अभियंता नाईक यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती