शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे पितळ २४ तासात उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 21:50 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.

ठळक मुद्देगोदणी रोडवरील प्रकार : रबर पॅकिंग तकलादू, पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर फुटलेल्या जलवाहिनीने पुन्हा दगा दिला आहे. दुरुस्तीसाठी लावलेले रबर पॅकिंग योग्यरित्या बसविले गेले नाही. त्यामुळे या वाहिनीवरून होणारा पाणीपुरवठा पुन्हा काही दिवस विस्कळीत होण्याची शक्यता वाढली आहे.भारत सरकारच्या महानेट प्रकल्पाचे काम करताना मजीप्राच्या मुख्य जलवाहिनीला मोठे छीद्र पडले. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाहात गेले. याविषयी पोलिसात तक्रार करण्यात आली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. मात्र याठिकाणी प्राधिकरण अधिकाऱ्यांचा अनुभवशून्यतेचा परिचय आला. जवळपास ३०० एमएमच्या या पाईपलाईनचे रबर पॅकिंग करण्यात आले. काम ओके झाल्याचा समज करत सोमवारी पाणीपुरवठ्यासाठी पाणी सोडण्यात आले. परंतु फुटलेल्या पाईपमधून पाणी वाहू लागल्याने पुरवठा बंद करण्यात आला.सदर काम करताना सुरुवातीला खराब झालेला संपूर्ण भाग काढून टाकला जाणार होता. मात्र केवळ रबर पॅकिंगचा निर्णय घेण्यात आला. हाच प्राधिकरणाच्या अंगलट आला आहे. कित्येक वर्षांपासून या विभागात काम करणारे अभियंते आणि कंत्राटदारांना सदर काम कशा पद्धतीने केले जावे, हे कळू नये याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे दोन ठिकाणचा कारभार आहे. आठवड्यातून तीन दिवस ते यवतमाळला देतात. कामांमध्ये केवळ चालढकल सुरू आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी उपविभागाकडे असल्याने कार्यकारी अभियंते निश्चिंत असल्याचे सांगितले जाते. प्राधिकरणाकडून होत असलेली अनेक कामे निकृष्ट केली जात असल्याने समस्या वाढत असल्याची ओरड आहे.साधारण कामासाठी तीन दिवसमहानेटच्या कामामुळे फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल तीन दिवस लावण्यात आले. केवळ ३०० एमएमची ही पाईपलाईन आहे. भविष्यात एक हजार एमएमची कामे या विभागाला करावी लागणार आहे. अशावेळी दुरुस्तीसाठी किती कालावधी खाणार हा चिंतायुक्त प्रश्न आहे. अमरावतीसारख्या ठिकाणी हजार एमएमची लाईन दुरुस्तीसाठी केवळ एक दिवस लागतो. यवतमाळात मात्र अनेक दिवस घेतात. अनुभवशून्य आणि चालढकल करणारे कंत्राटदार या विभागात आहेत. त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवत आहे. विशेष म्हणजे, शहरातील छोट्या पाईपलाईन दुरुस्तीची कामे करणारा कंत्राटदार बेंबळाची एक हजार एमएमची पाईपलाईन टाकत आहे. कामे देताना प्राधिकरणाकडूनही योग्य व्यक्तीची निवड होत नसल्याचे स्पष्ट होते.