शेतकरी कर्जमाफीसाठी वारकरी संघटनेची दिंडी

By Admin | Updated: March 24, 2017 02:12 IST2017-03-24T02:12:19+5:302017-03-24T02:12:19+5:30

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी शेतकरी वारकरी संघटनेतर्फे दिंडी काढण्यात आली.

Warkari Organization's Dindi for Farmer's Loan Approval | शेतकरी कर्जमाफीसाठी वारकरी संघटनेची दिंडी

शेतकरी कर्जमाफीसाठी वारकरी संघटनेची दिंडी

भजनातून व्यथा : झेंडे, पताकांनी लक्ष वेधले
यवतमाळ : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी गुरूवारी शेतकरी वारकरी संघटनेतर्फे दिंडी काढण्यात आली. यात वारकरी म्हणून शेतकरी सहभागी झाले होते.
सततच्या दुष्काळाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. शेतमाल पडलेल्या दरात खरेदी केला जात आहे. यामुळे कर्जाची परतफेड करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागणीसाठी दिंडी काढली.
तुरीला हमी दर, सोयाबीन दरात वाढ, शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीपासून संरक्षण यासह विविध मागण्यांसाठी पोस्टल ग्राउंडपासून दिंडी निघाली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत पुन्हा तिरंगा चौकात पोहोचली. शेतकरी व त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकणारे भजने गात मोर्चेकरी लक्ष वेधून घेत होते. दिंडीत भजनी मंडळ, वारकरी मंडळ, गुरूदेव सेवा मंडळाचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
दिंडीत सिकंदर शाह, राजू गावंडे, अनुप चव्हाण, अशोक भुतडा, नारायण राऊत, चिंतामण पायघन, दीपक मडसे, वासुदेव गुघाणे, पंकज गुघाणे, विजय राठोड, रोहित राठोड, नारायण गायकवाड, विषाद तडसे, दत्ता चांदोरे, रवी परडखे, मनोहर खोडे, जितेंद्र राठोड, छगन पाटील, अवि रोकडे, अरूण शिंदोडकर, बाळू शेंडे, रामभाऊ येलादे, पुरूषोत्तम खंडाळकर, परसराम करमले, गोलू बावणे, प्रवीण कांबळे, सुनील गेडाम, विनोद पेंदोर, सुरेश राऊत, विजय लांडगे, गुरूदेव सावरकर, बाबाराव डंभे, विजय पावडे, मोरेश्वर धुर्वे आदी सहभागी होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Warkari Organization's Dindi for Farmer's Loan Approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.