पंढरपूरसाठी वारकरी रवाना

By Admin | Updated: July 23, 2015 02:28 IST2015-07-23T02:28:01+5:302015-07-23T02:28:01+5:30

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी तालुक्यातील वारकरी बुधवारी रवाना झाले. येथील आगारातून वारकऱ्यांसाठी ‘पंढरपूर यात्रा स्पेशल’ बस सोडण्यात आली.

Warkari leaves for Pandharpur | पंढरपूरसाठी वारकरी रवाना

पंढरपूरसाठी वारकरी रवाना

वणी : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी तालुक्यातील वारकरी बुधवारी रवाना झाले. येथील आगारातून वारकऱ्यांसाठी ‘पंढरपूर यात्रा स्पेशल’ बस सोडण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून येथील एस.टी.आगारातून यात्रा स्पेशल बस सोडण्यात येत आहे. बुधवारी एम.एच.४०-वाय.५७८२ क्रमांकाची यात्रा स्पेशल बस सोडण्यात आली. आगार प्रमुख एन.आर.धारगावे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक एल.एम.मुळेवार, वाहतूक निरीक्षक एस.जी.धलवार, वरिष्ठ लिपीक तानाजी पाऊणकर व वारकऱ्यांनी नारळ फोडून बसचे पूजन केले. त्यानंतर ही बस पंढरपूरकडे रवाना झाली. बसमध्ये एकूण ३२ वारकरी आहेत. येथील आगरातर्फे दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी यात्रा स्पेशल बस सोडण्यात येत आहे.
ज्या गावात ४० ते ४५ वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी जुळत असेल, तर त्यांनी आगाराशी संपर्क साधावा, त्या गावातून वारकऱ्यांसाठी स्पेशल बस सोडण्यात येईल, अशी माहिती आगार प्रमुख धारगावे यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Warkari leaves for Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.