वडगाव जंगल ठाणेदाराच्या वाहनाला कोळंबीत अपघात
By Admin | Updated: October 17, 2016 01:38 IST2016-10-17T01:38:20+5:302016-10-17T01:38:20+5:30
वडगाव जंगल ठाणेदाराच्या शासकीय वाहनाला अपघात झाल्याची घटना कोळंब शिवारात रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

वडगाव जंगल ठाणेदाराच्या वाहनाला कोळंबीत अपघात
अकोलाबाजार : वडगाव जंगल ठाणेदाराच्या शासकीय वाहनाला अपघात झाल्याची घटना कोळंब शिवारात रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. समोरुन आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात जीप रस्त्याच्या खाली उतरली. सुर्दैवाने या अपघातात ठाणेदारासह चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
वडगाव जंगलचे ठाणेदार प्रकाश राऊत आपल्या शासकीय वाहनाने कोळंबी परिसरात पेट्रोलिंगवर होते. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास दुचाकीस्वार एका ट्रकला ओव्हरेटक करीत असताना वाहनासमोर आला. वाचविण्याच्या प्रयत्नात ठाणेदारांची जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत घसरली. त्यामुळे या वाहनाच्या काचा फुटल्या. अपघातात ठाणेदार राऊत आणि चालक सुखरुप आहे. (वार्ताहर)