वणीचे ठाणेदार वाघ यांची उचलबांगडी

By Admin | Updated: January 24, 2015 02:00 IST2015-01-24T02:00:56+5:302015-01-24T02:00:56+5:30

वार्षिक निरीक्षणादरम्यान कामकाजात अनागोंदी आढळून आल्याने वणीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

Wani Thanedar Tiger pulls off | वणीचे ठाणेदार वाघ यांची उचलबांगडी

वणीचे ठाणेदार वाघ यांची उचलबांगडी

यवतमाळ : वार्षिक निरीक्षणादरम्यान कामकाजात अनागोंदी आढळून आल्याने वणीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी या बदलीला दुजोरा दिला आहे.
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटका, अवैध दारू, कोंबडबाजार खुलेआम सुरू आहे. यासंबंधी अनेक तक्रारी संजय दरोडे यांना प्राप्त झाल्या होत्या. एवढेच नव्हे तर मनसेने या धंद्यांना प्रतिकात्मक विरोध करताना उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे दारू, जुगार यासारखे अवैध धंदे सुरू करण्याची परवानगी मागितली होती. दरम्यान वणी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये दराडे यांच्या आॅडीट पार्टीला पोलीस ठाण्यातीन कामकाजात अनेक अनागोंदी आढळून आल्या. अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. तपासातही अनेक त्रुट्यांसह बऱ्याच अनागोंदी आढळून आल्या. आॅडीट पार्टीने त्याचे नोटींग करून अहवाल दराडे यांच्याकडे सादर केला. याची गंभीर दखल घेत दराडे यांनी ठाणेदार वाघ यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली केली.
दरम्यान, दराडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, वणीत अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास प्रलंबित होता. दोषारोपपत्रामध्ये त्रुट्या आढळून आल्या. तपासासंबंधी कनिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात नव्हते. त्यामुळे वाघ यांची बदली करण्यात आली.
(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Wani Thanedar Tiger pulls off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.