वणी, पांढरकवडा उपविभागात पोहोचले रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स

By Admin | Updated: June 11, 2015 02:27 IST2015-06-11T02:27:07+5:302015-06-11T02:27:07+5:30

दंगलीवर जलद नियंत्रण मिळविण्याकरिता, दंगलस्थळी जलद पोहोचण्याकरिता तसेच दंगलीबद्दल पूर्व माहिती ठेवून रॅपीड अ‍ॅक्शन

The Wani, the Rapid Action Force, arrived in the white section subdivision | वणी, पांढरकवडा उपविभागात पोहोचले रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स

वणी, पांढरकवडा उपविभागात पोहोचले रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स

मारेगावात पथसंचलन : कायदा व सुव्यवस्थेची घेतली माहिती
वणी : दंगलीवर जलद नियंत्रण मिळविण्याकरिता, दंगलस्थळी जलद पोहोचण्याकरिता तसेच दंगलीबद्दल पूर्व माहिती ठेवून रॅपीड अ‍ॅक्शन घेण्याकरिता मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ‘रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स’च्या १०७ बटालियनने बुधवारी पांढरकवडा, वणी, मारेगाव व शिरपूर पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या.
या रॅपीड अ‍ॅक्शन फोर्समध्ये सहाय्यक कमांडंट एम.के. आर्या यांच्या नेतृत्वातील ५० कमांडो जिल्ह्यात दाखल झाले आहेत. ते विविध पोलीस ठाण्यात निरीक्षण व सर्वेक्षण करीत आहे. बुधवारी या चमूने वणी, पांढरकवडा, मारेगाव, शिरपूरला भेट दिली. पांढरकवडा येथे प्रभारी ठाणेदार राखी गेडाम यांच्याकडून त्यांनी परिसराची माहिती घेतली.
रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सची ही तुकडी ३ जूनला यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली आहे. येत्या १४ जूनपर्यंत ही तुकडी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना भेट देणार आहे. त्या ठाण्यांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेचा ही तुकडी अभ्यास करणार आहे. सोबतच सर्व पोलीस ठाणे व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा परिचय करून घेणार आहे. बुधवारी ही तुकडी मारेगाव शहरात दाखल झाली. पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन केले. प्रभारी ठाणेदार विजय कसोधन, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, लक्ष्मण गोळेकर यांच्यासह मारेगाव ठाण्यातील अधिकारी, कर्मचारीही या पथसंचलनात सहभागी झाले होते.
नंतर ही तुकडी वणीत धडकली. येथे ठाणेदार अस्लम खान यांनी तुकडीला टाण्याच्या हद्दीतील माहिती दिली. पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील दंगलीची माहिती, शहराची तालुक्याच्या लोकसंख्येची माहिती, संवेदनशील गावाची माहिती, धार्मिक वाद असलेल्या गावांची माहिती तसेच ईतर बाबींची माहिती व सर्व्हेक्षण करून ही तुकडी ती माहिती वरिष्ठांना पाठविणार आहे. याच तुकडीने नंतर शिरपूर पोलीस ठाण्यालाही भेट दिली. तेथे ठाणेदार मनोज केदारे यांनी तुकडीला विविध माहिती सादर केली. (लोकमत चमू)
दंगलीवर तत्काळ नियंत्रणासाठी प्रयत्न
एखाद्या ठिकाणी दंगल भडकल्यास किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, तेथे तत्काळ अ‍ॅक्शन घेण्यासाठी तसेच दंगलस्थळी त्वरित पोहोचण्यासाठी अपडेट माहिती या सर्व्हेक्षणातून संकलित केली जाणार आहे. त्यासाठीच ही चमू जिल्ह्यात दाखल झाली आहे.

Web Title: The Wani, the Rapid Action Force, arrived in the white section subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.