स्वतंत्र विदर्भासाठी पदयात्रा

By Admin | Updated: December 6, 2014 22:55 IST2014-12-06T22:55:42+5:302014-12-06T22:55:42+5:30

वेगळ्या विदर्भाची मागणी १०८ वर्षे जुनी आहे. मात्र विदर्भाला न्याय मिळाला नाही. उलट शोषण झाले. विदर्भ विकासात मागे पडला. या विरोेधात जिल्हा वकील संघ, आंदोलन समिती, जनमंच आणि शेतकरी

Walkway for Independent Vidarbha | स्वतंत्र विदर्भासाठी पदयात्रा

स्वतंत्र विदर्भासाठी पदयात्रा

यवतमाळ : वेगळ्या विदर्भाची मागणी १०८ वर्षे जुनी आहे. मात्र विदर्भाला न्याय मिळाला नाही. उलट शोषण झाले. विदर्भ विकासात मागे पडला. या विरोेधात जिल्हा वकील संघ, आंदोलन समिती, जनमंच आणि शेतकरी संघटनेने येथून जनजागरण पदयात्रा काढली. नागपूर अधिवेशनावर ही पदयात्रा धडक देणार आहे.
सन १९०५ पासून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी होत आहे. त्याकरिता सतत शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. याकाळात मिळालेली आश्वासने फोल ठरली. सिंचन, उद्योग, बेरोेजगारी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, प्रशासनातील रिक्त पदे, विकास कामांचा तुटवडा, निधीची कमतरता यासारखे अनेक प्रश्न विदर्भात निर्माण झाले. यावर मात करण्यासाठी केंद्र शासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीला संमती द्यावी, अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली आहे.
येथील जिल्हा न्यायालयासमोरून पदयात्रेला सुरुवात ाली. बसस्थानकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पाच कंदील चौकातील लोकनायक बापूजी अणे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. तेथून पदयात्रा पुढील प्रवासाला निघाली. ही पदयात्रा वर्धा, खडकी, बुटीबोरी मार्गे १२ डिसेंबरला धडकणार आहे.
जनजागरण पदयात्रेत वामनराव चटप, डॉ.श्रीनिवास खांदेवाले, राम नेवले, अ‍ॅड. अजय चमेडिया, अ‍ॅड. ए.पी. दर्डा, अ‍ॅड. वीरेन्द्र्र दरणे, अ‍ॅड. संतोष कुचनकर, अ‍ॅड. अमोल बोरखडे, सुजित राय, अ‍ॅड. सचिन बोबडे, अ‍ॅड. बी. आर. गोडे, अ‍ॅड. सुरज काकडे, अ‍ॅड जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. उमेश राऊत, संजय मसराम, दिनेश शाहू, राजेश चव्हाण, रूपेश घोसे, दीपक हांडे, निरंजन दाढे, राजेंद्र डांगे, राजेश पडगिलवार, अजय बिहाडे आदींनी सहभाग नोंदविला. (शहर वार्ताहर)

Web Title: Walkway for Independent Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.