शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
2
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
3
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
4
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
5
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
6
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
7
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
8
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
9
दिवाळी पाडवा २०२५: १० राशींना गुड न्यूज, समस्या संपतील; भाग्योदय-भरभराट, इच्छापूर्तीचा काळ!
10
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
11
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
12
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
13
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
14
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
15
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
16
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
17
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
18
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
19
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
20
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!

सोयाबीनच्या पसरवलेल्या ढिगांपुढे रात्रभर जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

बाजार समितीच्या गेटपासूनच घाणीला प्रारंभ होतो. सांडपाणी पसरलेले...मोकाट कुत्र्यांचे अथक केकाटणे... आणि सर्वत्र घुमत असलेला कुजका वास नाकातोंडात गेल्यावर होणारी जीवाची जळजळ... हे सारे सोसत दिवसभर घामाघुम झालेले कास्तकार पुन्हा त्याच ठिकाणी अख्खी रात्र कशी काढत असतील? काढावीच लागते. कारण त्यांच्या कष्टाचा खजिना त्यांनी दलालांपुढे उघडा मांडून ठेवलेला असतो, तो चोरांपासून तर वाचवायचाच असतो; पण कोणत्या वेळी कोणता दलाल येईल अन् भाव करून काटे करेल याचा नेम नाही. म्हणून रात्रभर जागणे आलेच.

ठळक मुद्देकुडकुडणाऱ्या कास्तकारांचा संताप : भईन कसंई आलं सरकार तरी सब्बन मरगाड आमच्यावरस !, सुटीच्या दिवशी मोजमाप

अविनाश साबापुरे । रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ बाजार समितीत सोयाबीन विकण्यासाठी आलेले कास्तकार संतापाने बोलत होते. यंदा परतीच्या पावसाने सोयाबीनचा ‘नासोडा’ केला. त्यानंतर आता सोयाबीन विक्रीची घाई सुरू झाली आहे. पण बाजार समितीत आल्यावर चार-चार दिवस ‘काटा’च होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हालअपेष्टा भोगत बाजार समितीतच उघड्यावर थंडीत कुडकुडत रात्र जागून काढावी लागत आहे. रात्रभर सोयाबीनच्या शेजारी ‘बिन सोया’ मुक्कामी राहणाºया कास्तकारांचा गुरूवारी रात्री घेतलेला हा ‘ऑन द स्पॉट’ वृत्तांत...बाजार समितीच्या गेटपासूनच घाणीला प्रारंभ होतो. सांडपाणी पसरलेले...मोकाट कुत्र्यांचे अथक केकाटणे... आणि सर्वत्र घुमत असलेला कुजका वास नाकातोंडात गेल्यावर होणारी जीवाची जळजळ... हे सारे सोसत दिवसभर घामाघुम झालेले कास्तकार पुन्हा त्याच ठिकाणी अख्खी रात्र कशी काढत असतील? काढावीच लागते. कारण त्यांच्या कष्टाचा खजिना त्यांनी दलालांपुढे उघडा मांडून ठेवलेला असतो, तो चोरांपासून तर वाचवायचाच असतो; पण कोणत्या वेळी कोणता दलाल येईल अन् भाव करून काटे करेल याचा नेम नाही. म्हणून रात्रभर जागणे आलेच.गेल्या आठवडाभरापासून यवतमाळ बाजार समितीत रात्रभर अगदी जत्रा दिसतेय. दाढीचे खुंट वाढलेले.. डोक्यावर मळका शेला गुंडाळलेले कास्तकार... इथून तिथे अन् तिकडून इकडे धावपळ करताना दिसतात. रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत ही धावपळ झाली की थकलेले जीव भाकरी सोडून सोयाबीनच्या ढिगाजवळ दोन घास खावून दोन घोट पाणी पिवून आडवे होतात. पण घरून आणलेल्या फाटक्या ब्लँकेटने त्यांचे अंगही पूर्ण झाकले जात नाही अन् दु:खही लपत नाही. कण्हने, कुंथने पहाटेपर्यंत अखंड राहू नये म्हणून मध्येच कोणीतरी तंबाखाची चिमूट चोळत बसतो अन् बाजूच्या कास्तकाराला ‘का हो भाऊजी कई होईन आपला काटा?’ असे विचारत ढकलून दिली जाते रात्र...कळंब तालुक्यातून बेलोरी गावातून आलेले महादेव घोडाम घरून आणलेला डब्बा उघडून जेवत होते. ते म्हणाले, आमी पाण्याच्या पयले काहाडलं सोयाबीन म्हणून वाचलं. बाकी तं पक्के मेलेच. संपूर्ण जिल्ह्यातच शेतकºयांची ही अवस्था आहे.पाच रुपयांत दोन भाकरी अन् बेसनबाजार समितीच्या परिसरात शेतकºयांसाठी स्वस्त जेवण उपलब्ध करून दिल्याचा दावा बाजार समितीने केला आहे. मात्र या कँटीनमध्ये जेवणासाठी दलालाचा पास न्यावा लागतो. त्या पासवर दोन भाकरी, बेसन मिळते. त्यात कोणत्याच कास्तकाराचे पोट भरत नाही. ‘एक्स्ट्रा’ भाकर १५ रुपयांची दिली जाते. साहजिकच पाच रुपयांचा पास नेणाऱ्या कास्तकाराच्या खिशातून ५० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जाते. पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून एक रांजन आहे. त्यावरची घाण पाहिल्यानंतर पाण्यातूनच कास्तकारांच्या पोटात आजार शिरण्याची धास्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर केवळ भात दिला जात आहे. अखेर लोनाडी (ता. नेर) येथील शेतकरी राजकुमार चव्हाण यांनी शुक्रवारी थेट बाजार समिती सभापतींना फोन करून भाकर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तेव्हा कुठे शनिवारी दिवसा ३०० आणि रात्री ६५ शेतकऱ्यांनी या कँटीनमध्ये जेवण केले.भावातही दलालांचीच मनमानीशुक्रवारी यवतमाळ बाजार समितीत सोयाबीनचे दर ३७०० रुपयांपर्यंत वर आले होते. पण तरीही चार दिवसांपासून येथे सोयाबीन घेऊन आलेल्या कास्तकारांना कमी भाव सांगितला गेला. लोनाडीचे राजकुमार चव्हाण, सिंदखेडचे नरेंद्र खडसे, नागापूरचे वासूदेव राठोड, तिवसाचे गजानन टेकाम, वाई हातोलाचे वसंत राठोड, सोनखासचे श्रीराम मानतुटे यांनी ही व्यथा मांडली. ते म्हणाले, आमच्या ढिगावरी ३७०० चा भाव सांगत दलाल येते. पण आमच्या ढिगाजवळ आला का भाव तीन हजाराच्या वर सरकतच नाई. मंग आज आमी दलालायले येऊ देनंच बंद करून टाकलं. बेलोराचे संतोष सोळंके, कारेगावचे राजकुमार काटेखाये, मेंढलाचे रामराव खडसे, मेहराबादचे विजय पाटील यांनीही हाच संताप बोलून दाखविला.यवतमाळ : घाम नाई बावाजी रगत आटवा लागते मातीत.. तवा निंगते सोयाबीन. आन् येवढ्या मेह्यनतीनं पिकवलं का मंग इथसा कोनी घ्याले नाई तय्यार. पोटच्या पोरावानी सोयाबीनचं पोतं रिचवून त्याच्याकाठी झोपा लागून रायलं. कोनी मंते अज होईन काटा, कोनी मंते उद्याबी होईन का नाई गॅरंटीस नाई... आपलं सरकार झालं बेक्कार राजेहो.. कवा भाजपचं होईन मंते, शिवसेनेचं होईन मंते, मंदातच कांगरेसवाले, राष्टवादीवालेबी करीन मंते सरकार... आमचे हाल कुत्रंय इचारत नाई.. भईन कसंई आलं सरकार तरी सब्बन मरगाड आमच्यावरस..!

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड