मालमत्ता करावरील दीड कोटी व्याज माफ

By Admin | Updated: February 3, 2015 23:02 IST2015-02-03T23:02:58+5:302015-02-03T23:02:58+5:30

नगरपरिषद मालमत्ता कराची थकबाकी ११ कोटी २५ लाख इतकी असून हा आकडा व्याज आकारणीने वाढतच आहे. त्यामुळे करवसुली केवळ ३५ ते ४० टक्केच होते. कराचा भरणा

Waiver of half the interest on property taxes | मालमत्ता करावरील दीड कोटी व्याज माफ

मालमत्ता करावरील दीड कोटी व्याज माफ

यवतमाळ : नगरपरिषद मालमत्ता कराची थकबाकी ११ कोटी २५ लाख इतकी असून हा आकडा व्याज आकारणीने वाढतच आहे. त्यामुळे करवसुली केवळ ३५ ते ४० टक्केच होते. कराचा भरणा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात करावा यासाठी नगरपरिषदेने ठराव करून व्याज माफीचा निर्णय घेतला आहे. १५ मार्च पर्यंत कराचा भरणार करणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळताच अंमलबजावणी केली जाणार आहे. यातून दीड कोटींचे व्याज माफ होणार आहे.
शहरात ३१ हजार मालमत्ताधारक आहेत. चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेकांना अवाजवी कर आकरणी झाली आहे. या थकित करावर मोठ्या प्रमाणात व्याज लागले आहे. त्यामुळे अनेकांनी न्यायालयात धाव घेतली. यात नगरपरिषदेचा बराच वेळ जातो. काही प्रकरणे लोकअदालतीत निकाली काढण्यात आली. आता या प्रकरणाचा कायमचा निपटारा करण्यासाठी व्याज माफी दिली जाणार आहे. यामुळे एकूण थकबाकीचा आकडा कमी झाल्याने कर वसूलीची टक्केवारी वाढणार असल्याचे नगराध्यक्ष सुभाष राय यांनी सांगितले. करावरच्या व्याज माफीबाबतही कायदेशीर बाबी मुख्याधिकाऱ्यांनी पडताळाव्या अशी सूचना सदस्यांनी केली.
शहरात स्वच्छतेचे काम करत असलेल्या बाबा ताज आणि संत गाडेबाबा याच संस्थाना संपूर्ण वर्षभराचे कंत्राट देण्याचा मागणी सदस्यांनी केली, याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यापूर्वीच्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे याच संस्थाना पुढे काम देण्याचा प्रस्ताव सदस्यांनी चर्चेतून उपस्थित केला. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Waiver of half the interest on property taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.