घोडेबाजारात मतदारांना ‘आकड्यां’ची प्रतीक्षा

By Admin | Updated: November 8, 2016 01:57 IST2016-11-08T01:57:58+5:302016-11-08T01:57:58+5:30

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणात ‘सक्षम’ तीन

Waiting for voters' numbers in horseback market | घोडेबाजारात मतदारांना ‘आकड्यां’ची प्रतीक्षा

घोडेबाजारात मतदारांना ‘आकड्यां’ची प्रतीक्षा

विधान परिषद : मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांची संख्या वाढली
सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळ
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणात ‘सक्षम’ तीन उमेदवार असल्याने घोडेबाजाराचा ‘आकडा’ कधी उघडतो, याची प्रतीक्षा लागली आहे. प्रचाराचा धुराळा उडत असला तरी केवळ ‘सर्व फॉर्म्युलिटी’ पूर्ण केली जातील, इतकाच शब्द देऊन उमेदवार ‘आशिर्वादा’ची अपेक्षा करत आहेत. त्यामुळे मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांची दिवसागणिक संख्या वाढत आहेत.
यवतमाळ विधान परिषद मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच तुल्यबळ लढत होत आहे. काँग्र्रेस, शिवसेना-भाजपा युती व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. हे उमेदवार सर्वच बाबतीत ‘दमखम’ आजमावणारे आहेत. अशा प्रकारची लढत येथे पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी मतदारांनी व्यूहरचना आखली आहे. प्रत्येकाने कोणा-कोणाला भेटायचे, याची तयारी केली आहे. केवळ याच मुद्द्यावर एका संघटनेनेही आकार घेतला आहे. उमेदवारांची अडचण ओळखून चिल्लरचा बाजार करण्यापेक्षा आमच्याकडे ठोकचा ‘गठ्ठा’ असल्याचे जाहीरपणे सांगितले जात आहे. यातही कोणी कोणत्या पक्षाशी बोलायचे हे ठरविण्यात आले आहे. शेवटी राजकारणातील बडे मासे छोट्या माश्यांच्या तावडीत सापडले आहेत. यात आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. सर्वच जण पक्षश्रेष्ठींपुढे आपली पत कायम ठेवण्यासाठी विधान परिषद उमेदवारांकरिता मतांची आकडेमोड करीत आहेत.
शिवसेना नेत्यांवर सर्वाधिक दबाव
सर्वाधिक दबाव हा शिवसेना नेत्यांवर आहे. थेट ‘मातोश्री’वरून उमेदवार आल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळेच लढतीतील एका उमेदवारासमोर या नेत्यांनीे ‘तहा’चा प्रस्ताव ठेवला. मात्र ‘गॉडफादर’ने बारामतीतून झाडाझडती घेतल्याने ऐनवेळी हा प्रस्ताव बारगळला. ही वार्तासुद्धा जाणीवपूर्वक पसरविण्यात आली. विधान परिषद निवडणुकीच्या घडामोडीकडे पंचेंद्रीये लावून बसलेल्या मतदारांनी त्यातील तथ्य किती, याची लगेच पडताळणी केली. नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचाय समिती सभापतींकडून प्रत्येक बारिकसारिक हालचाली टिपण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील जुन्या संबंधांना उजाळा दिला जात आहे. संधीचे ‘सोने’ सर्व मिळूनच करायचे, हे ठरले असले तरी ‘वाटा’ कसा मिळवायचा याची तयारी मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांकडून केली जात आहे.

मतदार म्हणतात, सर्वच पर्याय खुले
४मताचा जोगवा मागण्यासाठी आलेल्या प्रत्येक उमेदवाराला उघड समर्थन मागू नका, माझे मत तुम्हालाच आहे, अशा शब्दात मतदारांकडून सर्वच पर्याय खुले ठेवण्यात येत आहे. उघड भूमिका घेऊन माझे नुकसान करू नका, आपले काही कमी-जास्त झाले तरी चालेल, हा शपथेवर शब्द आहे, अशी भूमिका विधान परिषदेतील बहूतांश मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारांपुढचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे बनत आहे.

अशा झाल्या लढती
वर्ष उमेदवार
४१९८० जगन्नाथ डांगे (वर्धा) - सुरेश लोणकर
(वर्धा- यवतमाळ संयुक्त मतदारसंघ)
४१९८६ डॉ. पंजाबराव देशमुख (एस काँग्रेस) - कीर्ती गांधी (काँग्रेस)
४१९९२ विजय चोंढीकर (काँग्रेस) - बाळासाहेब चौधरी (अपक्ष)
४१९९८ एन. पी. हिराणी (राष्ट्रवादी काँग्रेस) - अविरोध निवड
४२००४ एन. पी. हिराणी (राष्ट्रवादी) - दीपक निलावार (अपक्ष)
४२०१० संदीप बाजोरिया (आघाडी) - दीपक निलावार (अपक्ष)

Web Title: Waiting for voters' numbers in horseback market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.