सिंचन साहित्याच्या अनुदानाची प्रतीक्षा

By Admin | Updated: May 14, 2015 02:19 IST2015-05-14T02:19:25+5:302015-05-14T02:19:25+5:30

अनुदानाच्या आशेने खरेदी केलेल्या सिंचन साहित्याची रक्कम परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही.

Waiting for irrigation material subsidy | सिंचन साहित्याच्या अनुदानाची प्रतीक्षा

सिंचन साहित्याच्या अनुदानाची प्रतीक्षा

वडकी : अनुदानाच्या आशेने खरेदी केलेल्या सिंचन साहित्याची रक्कम परिसरातील शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. गेली वर्षभरापासून शेतकरी कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. प्रत्यक्ष त्यांच्या पदरात ही रक्कम पडली नाही. कृषी साहित्य विक्री केंद्राचे संचालक या शेतकऱ्यांकडून रक्कम घेवून मोकळे झाले. आता मात्र शेतकऱ्यांना अनुदानासाठी चकरा माराव्या लागत आहे. कृषी विभागाने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी बोअरवेल खोदले. या आधारे सिंचन करता यावे म्हणून कृषी विभागाच्या योजनेनुसार अधिकृत तुषार व ठिबक संच विक्रेत्याकडून या साहित्याची खरेदी केली. शेतात सिंचन सुरू झाले.मात्र अनुदानाची रक्कम अजूनही मिळालेली नाही.
अल्पभूधारक शेतकऱ्याला ७५ टक्के तर साधारण शेतकऱ्याला ५० टक्के यानुसार अनुदान दिले जाणार होते. मात्र साहित्याची खरेदी संबंधित शेतकऱ्यांना विक्रेत्याकडून पूर्ण रकमेत करायची होती. शासनाचीच योजना असल्याने शेतकऱ्यांनी आडाचेदीड करून गोळा केलेल्या रकमेतून साहित्य खरेदी केले. परंतु कृषी सहायकांनी संच खरेदी केल्याची तपासणी प्रत्यक्ष शेतात जावून केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Waiting for irrigation material subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.