शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

ग्रामीण बांधकामांसाठी शेकडो कोटींची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

२५-१५ या लेखाशिर्षातून गावांमध्ये रस्ते, नाल्या, समाज मंदिर, रपटे या सारखी कामे केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यांंपासून या कामांना निधीच्या टंचाईचे ग्रहण लागले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये या कामांसाठी ३० कोटी ५७ लाख ५० हजार तर २०१९-२० साठी २८ कोटी २८ लाखांचा निधी लागणार आहे. २०१८-१९ मधील ९१२ कामे मंजूर होती. यातील यवतमाळच्या विशेष प्रकल्प विभागातील ९९ लाख ४४ हजार रुपये शिल्लक आहेत.

ठळक मुद्देगाव विकासांची कामे रखडली : उपलब्ध निधी वळविण्याचे प्रयत्न, ‘पीडब्ल्यूडी’ला हवे ५८ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या २५-१५ या लेखाशिर्षाअंतर्गत ग्रामीण भागात गावांच्या विकासाची कामे केली जातात. परंतु शासनाकडून निधी न आल्याने ही कामे प्रलंबित आहे. या कामांसाठी ग्रामीण विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याला शेकडो कोटींची आवश्यकता आहे.२५-१५ या लेखाशिर्षातून गावांमध्ये रस्ते, नाल्या, समाज मंदिर, रपटे या सारखी कामे केली जातात. परंतु गेल्या काही महिन्यांंपासून या कामांना निधीच्या टंचाईचे ग्रहण लागले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा विचार केल्यास २०१८-१९ मध्ये या कामांसाठी ३० कोटी ५७ लाख ५० हजार तर २०१९-२० साठी २८ कोटी २८ लाखांचा निधी लागणार आहे. २०१८-१९ मधील ९१२ कामे मंजूर होती. यातील यवतमाळच्या विशेष प्रकल्प विभागातील ९९ लाख ४४ हजार रुपये शिल्लक आहेत. मंजूर परंतु सुरू न झालेल्या कामांचा हा निधी आहे. तर दुसरीकडे कामे पूर्ण करूनही देयके प्रलंबित आहे. प्रलंबित देयके मार्गी लावण्यासाठी उपरोक्त ९९ लाखांचा निधी वळविण्याची मागणी कंत्राटदारांमधून होत आहे.जिल्हा परिषदेचा विचार केल्यास या लेखाशिर्षाअंतर्गत किमान ७० ते ८० कोटी रुपये ग्रामीण विकासासाठी लागणार आहे. त्यातही सर्वाधिक ६६ कोटींची कामे एकाच विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी केली गेली होती. पूर्वी ‘एलआरएस’ प्रणालीनुसार निधी शासनाकडून खात्यात टाकला जात होता. आता पुन्हा ‘बीडीएस’प्रणाली अवलंबिली जात आहे. त्यानुसार हा निधी कार्यकारी अभियंता किंवा वित्त विभागामार्फत दिला जातो.जिल्हा परिषदेच्या निधीला कुणीही मध्यस्थ नाही. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीसाठी मध्यस्थ असून एका विभागाची मंजुरी घ्यावी लागते. देयके न निघाल्याने गावखेड्यातील छोटे कंत्राटदार त्रस्त आहेत. उपलब्ध निधी वळवून देयके मंजूर करण्याची मागणी होत आहे.राज्यात हवे एक हजार २५० कोटी रुपयेराज्यात २५-१५ या लेखाशिर्षाअंतर्गत एक हजार २५० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती आहे. जुन्या भाजप-सेना सरकारमध्ये भाजप आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ही कामे केली गेली होती. पुन्हा सरकार आल्यास निधी देण्याचीही तयारी झाली. मात्र राज्यातील सरकार बदलले. नव्या सरकारने राजकीय डावपेच म्हणून या कामांना पैसाच दिला नाही, पैसे देताना विलंब केला. मार्च महिन्यात दुसरा हप्ता देण्यात आला नाही. त्यामुळे ग्रामीण विकासाला हातभार लावणाऱ्या कंत्राटदारांची व त्यांच्या भूमिकेत वावरणाºया काही राजकीय पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास