शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या यादीची प्रतीक्षा कायम; राजू तोडसाम यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 17:34 IST

वंचितचे दोन उमेदवार जाहीर : मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे बाळासाहेब मांगुळकर यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त असले तरी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत काँग्रेसकडून याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नव्हती. अनेकांना काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवार यादीची प्रतीक्षा होती. दरम्यान, आर्णी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजू तोडसाम यांनी भाजपमध्ये पुनश्च प्रवेश केल्याने तोडसाम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याने आता उमेदवारी भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. महायुतीतील भाजपने यवतमाळ, राळेगाव आणि वणी मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे इंद्रनील नाईक आणि दिग्रस मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर झालेली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने वणी मतदारसंघातून उद्धवसेनेच्या वतीने संजय देरकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. जिल्हावासीयांना प्रतीक्षा लागली आहे, ती काँग्रेस उमेदवारांच्या यादीची. 

यवतमाळ मतदारसंघातून बाळासाहेब मांगुळकर यांचे नाव निश्चित झाल्याबाबतचे मेसेज शुक्रवारी रात्री फिरत होते. मात्र, पक्षातर्फे अधिकृत घोषणा झालेली नव्हती. शुक्रवारी रात्री उशिरा अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने इतर मतदारसंघातही कोणाला उमेदवारी मिळते याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ही यादी आल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. 

जिल्ह्यात नऊ उमेदवारांनी दाखल केले नामांकन 

  • यवतमाळ : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आता नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेवटचे चार दिवस उरले आहेत. शुक्रवारी ९ उमेद- वारांनी नामांकन अर्ज दाखल केले. आतापर्यंत सात विधानसभांत १६ उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल झाले आहेत. आर्णी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून जितेंद्र शिवाजीराव मोघे यांनी अर्ज दाखल केला. तसेच अपक्ष नामदेव सोयाम, उमरखेड विधानसभा मतदारसं- घातून संध्या संदेश रणवीर, सदाशिव रामा वाठोरे यांनी नामांकन दाखल केले.
  • यवतमाळ विधानसभेत गुरुवारी तीन नामांकन अर्ज आले. यामध्ये स्नेहल विद्या-अरुण रेचे, मनोज महादेव गेडाम, दिलीप वामनराव बेलसरे यांचा समावेश आहे. तर वणी मतदारसंघात मनसेकडून राजू उंबरकर, पुसद विधानसभेतून मधुकर राठोड यांनी नामांकन दाखल केले आहे.
  • शुक्रवारी जिल्ह्यात ५७ इच्छुकांनी १०६ अर्जाची उचल केली आहे. शुक्रवारी दिवसभर महाविकास आघाडीतील काँग्रेसची दुसरी यादी कधी प्रसिद्ध होते, याचीच चर्चा होती. 

वाघमारे यांची उमेदवारी जाहीर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी रात्री उशिरा ४५ उमेदवारांची सहावी यादी जाहीर झाली. यामध्ये जिल्ह्यातील दोन मतदारसं घांतील उमेदवारांचा समावेश आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी डॉ. नीरज ओमप्रकाश वाघमारे तर दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी नाजूकराव धांदे यांची उमेदवारी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली. इतर मतदारसंघांतील उमेदवार शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

राजू तोडसाम यांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा आर्णी विधानसभा मतदारसंघात भाजप कोणाला मैदानात उतरवते याबाबतची उत्सुकता असतानाच माजी आमदार राजू तोडसाम यांनी शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतल्याने आर्णीमधून भाजपच्या वतीने तोडसाम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजू तोडसाम यांनी शिवाजीराव मोघे यांचा पराभव करून भाजपतर्फे विधानसभा गाठली होती. तोडसाम यांना ८६ हजार ९९१ तर मोघे यांना ६६ हजार २७० मते मिळाली होती. त्यामुळे यंदा या मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Yavatmalयवतमाळ