वाघापूर व पिंपळगाव परिसरात भूमिगत गटारांची कामे दर्जाहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST2020-02-02T06:00:00+5:302020-02-02T06:00:19+5:30
वाघापूर आणि पिंपळगाव परिसरात भूमिगत गटाराची कामे हाती घेण्यात आली आहेत. मनमानी पध्दतीने काम केले जात आहे. नागरिकांच्या होणाºया नुकसानीचा कुठलाही विचार केला जात नाही. पिण्याच्या पाण्याचे नळ खोदकाम करताना तुटले. जोडून देण्याचे सौजन्य तर दूर, अरेरावीची भाषा वापरली जात आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

वाघापूर व पिंपळगाव परिसरात भूमिगत गटारांची कामे दर्जाहीन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात होत असलेले भूमिगत गटाराचे काम दर्जाहीन होत आहे. निकृष्ट सिमेंट, विटा वापरल्या जात आहे. खोदकामही नियमबाह्य करण्यात येत आहे. क्युरीन केले जात नाही. या कामावर देखरेखीसाठी अनुभवशून्य लोकं ठेवण्यात आले आहे. खोदलेल्या नाल्या बुजविल्या जात नाही. त्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांनी केलेल्या या तक्रारींकडून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाघापूर आणि पिंपळगाव परिसरात भूमिगत गटाराची कामे हाती घेण्यात आली आहेत. मनमानी पध्दतीने काम केले जात आहे. नागरिकांच्या होणाºया नुकसानीचा कुठलाही विचार केला जात नाही. पिण्याच्या पाण्याचे नळ खोदकाम करताना तुटले. जोडून देण्याचे सौजन्य तर दूर, अरेरावीची भाषा वापरली जात आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. सदर योजनेच्या यशस्वीतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. योजना फेल गेल्यास वसाहतींमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव होऊन अनेक आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खोदकाम केलेले रस्तेही योग्यरित्या बुजविले गेले नसल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
नियमानुसार काम होत नाही. अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात नाही. त्यामुळे या कामाची खरी परीक्षा योजना कार्यान्वित झाल्यावरच होणार आहे. जेसीबीने खड्डे खोदून ठेवले गेले आहेत. त्यामध्ये कित्येक नागरिक रात्रीच्या अंधारामध्ये पडले आहेत. विशेषत: प्राणीही बांधलेल्या टाक्यामध्ये पडल्याचे दिसते. अवैध प्रकारचा रेतीसाठा तसेच गिट्टीची चुरी बांधकामासाठी वापरण्यात येत आहे. कामासाठी वापरण्यात आलेला प्लास्टिकचा पाईपही अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप केला जात आहे. साधा खिळासुद्धा त्यामध्ये जातो. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी आहे.