वाचे विठ्ठल गाईन, नाचत पंढरी जाईन
By Admin | Updated: June 30, 2017 02:05 IST2017-06-30T02:05:23+5:302017-06-30T02:05:23+5:30
वाचे विठ्ठल गाईन, नाचत पंढरी जाईन... या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित भजनाचे विदर्भस्तरीय खंजिरी

वाचे विठ्ठल गाईन, नाचत पंढरी जाईन
विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा : बाबासाहेब नाईक स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन, श्रोते मंत्रमुग्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : वाचे विठ्ठल गाईन, नाचत पंढरी जाईन... या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित भजनाचे विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेला प्रारंभ झाला. एकापेक्षा एक सरस भजने सांग्रसंगीत सादर करून विविध भजनी मंडळांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केली. निमित्त होते बाळासाहेब नाईक स्मृतिदिनानिमित्त आयोजित विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे.
स्थानिक गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात बाबासाहेब नाईक स्मृतिदिन समितीच्यावतीने विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत नऊ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. यापैकी महाराणाप्रताप गुरूदेव सेवा मंडळ, यवतमाळने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. दुसरे बक्षीस रोख राष्ट्रसंत भजनी मंडळ, जनुना ता.मंगरूळपीर, तिसरे बक्षीस जय मुंगसाजी माऊली भजनी मंडळ, वाल्पी-साल्पी ता.बार्शिटाकळी, चवथे बक्षीस मुंगसाजी महाराज भजनी मंडळ, कोळंबी ता.मंगरूळपीर, पाचवे बक्षीस मनस्वी भजनी मंडळ, कुऱ्हा तळणी ता.आर्णी, सहावे बक्षीस श्री गणेश भजनी मंडळ, राहूर ता.महागाव आदींनी पटाकविले.
स्पर्धेच्या प्रारंभी अमरावती येथील समाजकल्याण अधिकारी श्रीकृष्ण पखाले यांनी राष्ट्रसंतांचे मानवतेचे व देशप्रेमाचे विचार या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर दीप प्रज्वलन करून भजन स्पर्धेचे उद्घाटन डॉ.के.जी. बेलोरकर, पांडुरंग अजमिरे, राधेश्याम जांगीड, डॉ.राजेंद्र जाजू, डॉ.उत्तम रुद्रवार आदींच्या हस्ते करण्यात आले.
यशस्वीतेसाठी जय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.राजेश पाचकोर, पंजाबराव हनवते, डॉ.संजय गुंबळे, रंगराव लकडे, राजू बनस्कर, नंदकुमार पंडित, प्रशांत आत्राम, विवेक बैस्कार, मधुकर अजमिरे, एफ.आर. पवार आदींनी परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून गोपाल सालोटकर, श्रीकृष्ण पखाले आदींनी काम पाहिले.