बाजार समितीसाठी आज मतदान
By Admin | Updated: October 9, 2016 00:09 IST2016-10-09T00:09:20+5:302016-10-09T00:09:20+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी रविवार, ९ आॅक्टोबरला मतदान होत आहे.

बाजार समितीसाठी आज मतदान
यवतमाळ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदांसाठी रविवार, ९ आॅक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी ११ मतदान केंद्र राहणार असून ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्यााचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर व जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत गाडे यांच्या नेतृत्वातील दोन पॅनेलमध्ये सरळ लढत होत आहे. पणन व प्रक्रिया मतदार संघात केवळ एकच उमेदवार असल्याने आता उर्वरित १८ संचालकांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांसह अपक्षही रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने संपूर्ण ताकद पणाला लावून बाजार समितीवरील सूर्यकांत गाडे यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे सत्ता कायम राखण्यासाठी गाडे यांनीही प्रतिष्ठा पणास लावली आहे.
मतदानासाठी ११ केंद्र निर्माण करण्यात आले आहे. यात यवतमाळात पाच आणि येळाबारा, अकोलाबाजार व भांबराजा येथे प्रत्येकी दोन केंद्र आहे. एकूण ६० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)