शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

८० हजार मतदारापर्यंत वोटर स्लिप गेल्या नाही; नागरिकांच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 17:27 IST

त्या मतदारांसाठी हेल्पलाइन सेंटर : बीएलओंकडे जबाबदारी

रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यातील मतदारांना आपले मतदान कुठे आहे, याची माहिती मिळावी म्हणून व्होटर स्लिप वितरित करते. ग्रामीण भागात व्होटर स्लिपचा प्रश्न येत नाही. मात्र, शहरी भागात व्होटर स्लिप मिळत नाही. लोकसभा निवडणुकीत ह्या तक्रारी होत्या. यावेळी निवडणूक विभागाने कंबर कसली आहे. गत चार दिवसांपासून व्होटर स्लिप वितरण केले जात आहे. मात्र, अजूनही ८० हजार मतदारांना व्होटर स्लिप मिळाल्या नाही. अशा मतदारांसाठी व्होटर हेल्पलाईन सेंटर असणार आहे.

जिल्ह्यात २२ लाख ५२ हजार १७१ मतदार आहेत. यात ११ लाख ५० हजार ३९८ पुरुष मतदार, तर ११ लाख एक हजार ७१२ महिला मतदार आहेत. या मतदारांना त्यांच्या घरापर्यंत व्होटर स्लिप वितरणाची मोहीम निवडणूक विभागाने हाती घेतली आहे बीएलओंच्या माध्यमातून ह्या व्होटर स्लिप वितरित केल्या जात आहेत. चार दिवसांपासून ही मोहीम राबविली जात असताना अनेकांना व्होटर स्लिप मिळाली नाही. यात अनेक बाबी कारणीभूत ठरल्या आहेत. वोटर घरी नाही, काही स्थलांतरित झाले आहेत. तर काही घरापर्यंत बीएलओ पोहोचले नाही. यातून या मतदानाच्या वोटर स्लिपचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कुठल्याही मतदान केंद्रावर मतदाराला आपले नाव कुठल्या ठिकाणी यादीमध्ये प्रसिद्ध झाले आहे याची माहिती मिळविता येणार आहे. याशिवाय, शहरातील चौकांमध्ये स्कॅनर बोर्ड लावण्यात आले आहे. या स्कॅनर बोर्डवर स्मार्टफोनवरून स्कॅन करून वोटर मतदार यादी संदर्भातील माहिती काही क्षणात मिळविता येणार आहे. यामुळे मतदारांची होणारी धावपळ टळणार आहे. प्रत्येक बीएलओकडे असलेल्या स्मार्टफोनवरूनही आपले मतदान केंद्र शोधता येणार आहे.

यवतमाळ विधानसभा क्षेत्रात वाटपाचे प्रमाण घटलेयवतमाळ विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक तीन लाख ७१ हजार २७९ मतदार येतात. यापैकी तीन लाख २३ हजार ८२८ मतदारापर्यंत व्होटर स्लिप पोहोचल्या. या ठिकाणच्या ४७ हजार ४५१ मतदारांना अद्याप व्होटर स्लिप मिळायच्या आहेत. सात विधानसभा क्षेत्रातील अर्ध्या अधिक व्होटर स्लिप वितरणाचे काम यवतमाळात माघारले आहे. या ठिकाणी ८७.२२ टक्के मतदान पार पडले आहे.

पुसद विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक वितरण पुसद विधानसभा क्षेत्रात तीन लाख २१ हजार ८२६ मतदारांना ह्या स्लिप वितरित करायच्या होत्या. यापैकी तीन लाख १९ हजार ६३६ मतदारांच्या घरपर्यंत ओटर स्लिप पोहोचल्या आहेत. वितरण प्रक्रियेत पुसद विभाग आघाडीवर आहे

तर मतदान केंद्रावर मिळणार माहिती ज्या मतदारांना व्होटर स्लिप मिळाली नाही अशा मतदारांना व्होटर स्लिप हेल्पलाईन सेंटरवर ही माहिती मिळणार आहे. असे सेंटर प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार आहे. यात मतदारांना आपले नाव कुठे आहे याची माहिती मिळणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Yavatmalयवतमाळ