टिपेश्वर अभयारण्यात अतिशय तगड्या 'स्टार' या वाघाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 10:51 IST2021-02-25T10:50:46+5:302021-02-25T10:51:12+5:30
Yawatmal News टिपेश्वर अभयारण्यात स्टार या नर वाघाचे वाघ्र प्रेमींना दर्शन झाले .

टिपेश्वर अभयारण्यात अतिशय तगड्या 'स्टार' या वाघाचे दर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा वनसंपदेने नटला आहे. याच साखळीत टिपेश्वर अभयारण्य देखील येते. पर्यटकांना व्याघ्र दर्शन होत असल्याने टिपेश्वर गर्दीने फुलून गेले आहे. या अभयारण्यात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढा वाढला आहे.. अशातच या अभयारण्यात स्टार या नर वाघाचेवाघ्र प्रेमींना दर्शन झाले . हा नर वाघ अतिशय ताकदवर समजला जातो . या भागात जे कोणते बछडे आहेत तेयाच नरवाघाचे बछडे असल्याचे मानले जाते . याच दर्शन होणे हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते . या नर वाघाच्या दर्शनाने व्याघ्र प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे .