हिवरा येथे कोरोना नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:39 IST2021-05-17T04:39:17+5:302021-05-17T04:39:17+5:30

महागाव : तालुक्यातील हिवरा येथे भुसार व्यापारी कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता बळावली आहे. ...

Violation of corona rules at Hiwara | हिवरा येथे कोरोना नियमांचे उल्लंघन

हिवरा येथे कोरोना नियमांचे उल्लंघन

महागाव : तालुक्यातील हिवरा येथे भुसार व्यापारी कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता बळावली आहे.

मागील महिन्यात हिवरा येथे कोरोनाने कहर केला होता. त्यामुळे महसूल, आरोग्य आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने तेथे एका आठवड्याचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आली. आता तेथील भुसार व्यापार झाडाच्या सावलीत सुरू आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. याकडे आपत्ती व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हिवरासंगम येथे पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता बळावली आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले. मात्र, हिवरा येथे व्यापारी नियमांची पायमल्ली करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील फुलसावंगी येथे काही दिवसांपूर्वी एका सुवर्णकाराला ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. तरीही हिवरा येथे व्यापारी निडर होऊन व्यवसाय सुरू ठेवत आहेत.

Web Title: Violation of corona rules at Hiwara