गावकऱ्यांनी गोळा केली शहिदांच्या कुटुंबासाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 21:58 IST2019-02-17T21:57:13+5:302019-02-17T21:58:15+5:30
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले आहेत. रविवारी दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडाच्या गावकºयांनी प्रभातफेरी काढून सैनिक कुटुंबांसाठी मदत गोळा केली. ही मदत जिल्हा प्रशासनामार्फत पाठविणार आहे.

गावकऱ्यांनी गोळा केली शहिदांच्या कुटुंबासाठी मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी गावकरी पुढे सरसावले आहेत. रविवारी दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडाच्या गावकºयांनी प्रभातफेरी काढून सैनिक कुटुंबांसाठी मदत गोळा केली. ही मदत जिल्हा प्रशासनामार्फत पाठविणार आहे.
चाणी आणि कामठवाडा येथील युवा मंडळाने रविवारी पहाटेपासून मदत गोळा करण्यास सुरूवात केली. घरोघरी जाऊन मदतपेटीमध्ये मदत गोळा करण्यात येत होती.
या मदतफेरीत अबालवृद्धांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये पंडित हिंगासपुरे, गजानन गुल्हाने, महादेव पाटेकर, ब्रम्हदेव जाधव, पुंडलिक धारणे, महादेव फुपरे, विलास भालदांड, बालू उके, नरेश अजमिरे, पुरूषोत्तम अरसोड, गणेश तंबाखे, प्रदीप फुपरे, नितीन नेमाने, मधुकर अजमिरे, रवी अजमिरे, अवधुत अजमिरे, विनोद जाधव, राजू ठोकळ, नामदेव ठोकळ उपस्थित होते.