शाळा बंदविरोधात ग्रामस्थ जिल्हा कचेरीवर धडकले

By Admin | Updated: March 6, 2016 03:12 IST2016-03-06T03:12:37+5:302016-03-06T03:12:37+5:30

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांची ओढताण होणार आहे.

Village villagers protested against the school closure | शाळा बंदविरोधात ग्रामस्थ जिल्हा कचेरीवर धडकले

शाळा बंदविरोधात ग्रामस्थ जिल्हा कचेरीवर धडकले

यवतमाळ : कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांची ओढताण होणार आहे. हा निर्णय म्हणजे भावी पिढीचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे, असा आरोप करीत शिक्षकांसोबत गावकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
बालकांचा मोफत व सक्तीचा कायदा २००९ मध्ये लागू झाला. मात्र कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. शाळा बंदचा निर्णय शिक्षणव्यवस्था मोडीत काढणारा आहे. या निर्णयाविरोधातील आंदोलनात शिक्षकासोबत ग्रामस्थ, शाळा सुधार समितीचे सदस्य सहभागी झाले होते. आंदोलनात डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे पप्पू पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष सतीश काळे, विदर्भ प्रांत प्रमुख कैलास राऊत, राजकुमार भोयर, भारतीय किसान ब्रिगेडचे अजय पिसाळकर, प्रशांत ढाले, सय्यद दाऊद, जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, शालेय कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष निरज डफळे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाले, संभाजी ब्रिगेडचे योगेश धानोरकर, उर्दू शिक्षक संघटनेचे हयाद खान, अखिल शिक्षक संघाचे रमाकांत मोहरकर, अनुसूचित जाती जमाती परिसंघाचे एम.के. कोडापे, प्रमोद कांबळे, गणित अध्यापक मंडळाचे विजय विसपुते, शिक्षक परिषदेचे राजेश मदने, मुख्याध्यापक संघाचे प्रकाश भुमकाळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर ठाकरे, जिल्हा कार्याध्यक्ष शुभम गरू ड, जसप्रित नन्नारे आदी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)

Web Title: Village villagers protested against the school closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.