ग्रामस्तरीय समित्या बनल्या केवळ नामधारीच

By Admin | Updated: November 2, 2016 01:05 IST2016-11-02T01:05:54+5:302016-11-02T01:05:54+5:30

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत ..

Village level committees were made only by the name of Namdhari | ग्रामस्तरीय समित्या बनल्या केवळ नामधारीच

ग्रामस्तरीय समित्या बनल्या केवळ नामधारीच

उपयोगिताच नाही : वर्षभरापासून जिल्ह्यातील १८४८ समित्यांची कामगिरी गुलदस्त्यात, तक्रारी वाढल्या
यवतमाळ : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. टोकाची भूमिका घेतलेले शेतकरी कुटुंब निदर्शनात का आले नाही, त्यांना मदत का करण्यात आली नाही, याचे उत्तर प्रशासनाना ग्रामस्तरीय समितीला द्यावे लागणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु आजही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत, यामध्ये या समित्या काय करीत आहे, हे समजायला मार्ग नाही.
या समित्यांना निधीही वितरीत करण्यात आला. त्यामुळे गावातील शेतक-यांना गावातच मदत का वितरीत करण्यात आली नाही,
जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान काम करीत आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणने त्यांची आर्थिक बाजू बळकट करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठीच जिल्हयातील प्रत्येक गावात ग्रामस्तरावर अभियानांतर्गत १८४८ समित्या स्थापन करण्यात आल्या. शेतकऱ्यांना सामाजिक, आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी समित्यांना काम करावे लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सरपंच या समितीचे अध्यक्ष असून ग्रामसेवक सचिव आहेत. गावातीलच चार प्रतिष्ठीत व्यक्ती, तीन महिला, माजी सैनिक, दोन प्रगतिशील शेतकरी, अंगणवाडी सेविका, यांच्यासह इतर सभासदांचा या समितीमध्ये समावेश आहे.
त्याचबरोबर पाच हजारापर्यंतची मदत, बीनव्याजी कर्ज, हातऊसने, आकस्मित खर्च, आजारपण, अपघात यासाठी निधीही समित्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे असतानाही गावातील शेतकरी जर टोकाची भूमिका घेत असेल तर ग्रामस्तरीय समिती अशा शेतकऱ्यांपर्यंत का पोहचली नाही, त्यांचे सर्वेक्षण का करण्यात आले नाही, दिलेला निधीचा विनियोग अद्यापपर्यंत का करण्यात आला नाही. याची विचारणा समित्यांना करण्यात येऊन समित्यांकडे असलेल्या अखर्चित निधीचा अहवाल मागविल्या जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्तरीय समितीने गावातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत संपर्क साधून त्यांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी काय पावले उचलली, गावातील शेतकऱ्यांची संख्या, नैराश्यात असलेले शेतकरी, आर्थिक विवंचनेत असलेले शेतकरी यांची इंत्भूत माहिती समितीला असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Village level committees were made only by the name of Namdhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.