विजय दर्डा यांची गणेश मंडळाला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:21 IST2018-09-17T21:21:18+5:302018-09-17T21:21:36+5:30

गणेशोत्सवाचे ४९ वे वर्ष साजरे करत असलेल्या येथील तिवारी चौकातील अवधुत गणेशोत्सव मंडळाला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी भेट दिली. या मानाच्या गणपतीची पूजा करून त्यांनी बळीराजाच्या सुखसमृध्दीसाठी प्रार्थना केली.

Vijay Darda visits Ganesh Mandal | विजय दर्डा यांची गणेश मंडळाला भेट

विजय दर्डा यांची गणेश मंडळाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गणेशोत्सवाचे ४९ वे वर्ष साजरे करत असलेल्या येथील तिवारी चौकातील अवधुत गणेशोत्सव मंडळाला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी रविवारी भेट दिली. या मानाच्या गणपतीची पूजा करून त्यांनी बळीराजाच्या सुखसमृध्दीसाठी प्रार्थना केली.
यावेळी विजय दर्डा यांचा अवधुत गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, गणेश मंडळाचे उपाध्यक्ष प्रताप पारसकर, अनंता जोशी, सचिव कुलभूषण तिवारी, रवी देशपांडे, गणेश तिडके, रवी ढोक, निखिल सराफ, कदीर बेग, नितेंद्र तिवारी, प्रभात तिवारी, रवींद्र तिवारी, विवेक तिवारी, प्रमोद तिवारी, दीपक ठाकूर, बाळासाहेब दौलतकार, बाळू पाठक, बाला धलवार, सौरभ तिवारी, शुभम तिवारी, रोहित जयस्वाल, अमित शर्मा, लकी सुलभेवार, नाझीम सोरसिया, आशू दुद्दरवार, सावळे, उघडे, जय झरे, नन्नारे, डीके आदी उपस्थित होते.

Web Title: Vijay Darda visits Ganesh Mandal