आझाद मैदानाच्या विकासकामांची विजय दर्डा यांनी केली पाहणी
By Admin | Updated: April 13, 2015 00:41 IST2015-04-13T00:41:28+5:302015-04-13T00:41:28+5:30
शहरातील आझाद मैदानाच्या विकासकाम वादग्रस्त ठरले आहे. शहराची ऐतिहासिक धरोहर असलेल्या आझाद

आझाद मैदानाच्या विकासकामांची विजय दर्डा यांनी केली पाहणी
सुधारणा सुचविल्या : आराखड्याबाबत २० एप्रिलला संयुक्त बैठक
यवतमाळ : शहरातील आझाद मैदानाच्या विकासकाम वादग्रस्त ठरले आहे. शहराची ऐतिहासिक धरोहर असलेल्या आझाद मैदानातील कामाची लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष सुभाष राय यांनी रविवारी दुपारी संयुक्त पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी आराखड्यातील सुधारणेबाबत चर्चा करण्यात
आली.
ऐतिहासिक वारसा असलेल्या आझाद मैदानाचे अस्तित्व अबाधित राहावे अशी सूचना खासदार दर्डा यांनी केली. याच मुद्यावर २० एप्रिल रोजी पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, खासदार विजय दर्डा यांची संयुक्त बैठक होणार आहे. आझाद मैदानाच्या संदर्भात स्थापन झालेल्या आझाद मैदान बचाओ समितीच्या सदस्यांशीही चर्चा करण्यात आली.
अस्तित्वात असलेल्या विकास आरखड्यात बदल करून बैठकीत एकमताने ठरविण्यात आलेल्या शिफारशीनुसार आझाद मैदानाचे सौंदर्यीकरण केले जाईल. तोपर्यंत तेथील काम सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.
(कार्यालय प्रतिनिधी)