शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला उमरखेडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 11:12 IST

मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये बुधवारी देण्यात आला.

- अविनाश खंदारेउमरखेड : मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठा जातीचा विदर्भातील पहिला दाखला जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये बुधवारी देण्यात आला. उमरखेडचे उपविभागीय महसूल अधिकारी स्वप्नील कापडनीस यांनी स्वप्नील कनवाळे या तरुणाला हा दाखला दिला. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर या समाजातील तरुणांना जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची ओढ लागली होती. हे प्रमाणपत्र देणे आता सुरू झाले आहे. उमरखेडच्या एसडीओ कार्यालयाने मराठा जातीचे हे प्रमाणपत्र जारी केले. विदर्भातील हे पहिले प्रमाणपत्र असल्याचे एसडीओ कार्यालयातून सांगण्यात आले.लवकरच ७२ हजार पदांची शासकीय नोकरभरती होणार आहे. तरुणाईला या भरतीचे वेध लागले आहेत. या भरतीत आरक्षणाचा लाभ मिळविण्यासाठी मराठा समाजातील तरुण सरसावले आहे. त्यासाठीच त्यांनी मराठा जातीचे दाखले मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. बुधवारी एसडीओ स्वप्नील कापडनीस यांनी स्वत: स्वप्नील कनवाळे या तरुणाला मराठा जातीचा दाखला बहाल केला. यावेळी नायब तहसीलदार सुधीर देशमुख, शिवाजी माने, सचिन घाडगे, प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण कलाने, विकास डोळस, भगाजी शिवरतवाड, अमोल भालेराव, भागवत माने आदी हजर होते.दाखले सर्वत्र उपलब्धआगामी ७२ हजार पदांची मेगा भरती लक्षात घेता मराठा जातीचे दाखले सर्वच उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयातून जारी होत आहेत. मराठा समाजातील तरुण-तरूणींनी आपल्या जवळच्या एसडीओ कार्यालयात जाऊन हे दाखले प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन उमरखेडच्या एसडीओ कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :marathaमराठाCaste certificateजात प्रमाणपत्र