शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बेधुंद ‘ड्रायव्हिंग’ने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 21:10 IST

शहरातील पांढरकवडा मार्गावर मालानीबागसमोर सुसाट वेगाने जाणारी कार निंबाच्या झाडावर धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस करून आल्यानंतर धुंदीत कार चालविणे जीवावर बेतले. हा थरार शनिवारी रात्री १० वाजता घडला.

ठळक मुद्देपांढरकवडा मार्गावर थरार : कारच्या धडके ने झाडही तुटून कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील पांढरकवडा मार्गावर मालानीबागसमोर सुसाट वेगाने जाणारी कार निंबाच्या झाडावर धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस करून आल्यानंतर धुंदीत कार चालविणे जीवावर बेतले. हा थरार शनिवारी रात्री १० वाजता घडला.नमीत संदीप कराळे (१७), संतोष किशोर गडमडे (२५) दोघेही रा. माळीपुरा यवतमाळ अशी मृतांची नावे आहेत. तर चालक धनराज बाबाराव राठोड (२५) याच्यासह गोवर्धन लक्ष्मण भेंडारे (२०) हे दोघे जखमी आहेत. पाढंरकवडा मार्गावरच्या एका हॉटेलमध्ये मित्राचा वाढदिवस असल्याने हे चौघे जण कारने (क्र.एमएच २९ एडी ४८८९) हॉटलेमध्ये पोहोचले. तेथे काही काळ घालविल्यानंतर तलावफैलातील एका मित्राला घरी सोडण्यासाठी परत आले. मित्राला सोडून पुन्हा हॉटेलकडे जात असताना धनराज हा सुसाट वेगाने गाडी चालवत होता. त्याचे कारवरचे नियंत्रण सुटल्यानंतर तो थेट रस्त्याच्या कडेवर असलेल्या निबांच्या झाडावर जाऊन धडकला. या धडकेत झाडाचे तुकडे झाले. धडक इतकी जबर होती की कारमध्ये बसलेल्या चौघांपैकी दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.चालक धनराज व गोवर्धन याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोवर्धन भेंडारे याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी चालक धनराज राठोड याच्या विरोधात भादंवि २७९, ३३८, ३०४ नुसार गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू