वन्यप्राण्यांनी केले उभे पीक आडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST2021-09-21T04:47:59+5:302021-09-21T04:47:59+5:30
महागाव : सोयाबीनचे पीक आता परिपक्व झाले आहे. सध्या पीक काढणीला आले आहे. मात्र, हातातोंडाशी आलेले पीक वन्यप्राणी आडवे ...

वन्यप्राण्यांनी केले उभे पीक आडवे
महागाव : सोयाबीनचे पीक आता परिपक्व झाले आहे. सध्या पीक काढणीला आले आहे. मात्र, हातातोंडाशी आलेले पीक वन्यप्राणी आडवे करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील काळी दौ. सर्कलमधील पंकज राठोड (रा. वागद ईजारा) या शेतकऱ्याने तीन एकरात मोठ्या कष्टाने पिकविलेल्या व काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वडिलांनी याच कारणातून चार वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.
दरम्यान, सोमवारी झालेल्या नुकसानीची पाहणीकरिता वनविभागाचे कर्मचारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव पोहोचले. काळी दौ. वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्याने नुकसानीचा पंचनामा केला. शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली.
200921\img-20210919-wa0057.jpg
नुकसान ग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करतांना वनविभागाचे कर्मचारी