शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

भाजीपाला उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 5:00 AM

शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या हवामानाने कीड नियंत्रण करणेही अशक्य होत आहे. व्यापारी नफा ठेवून शेतमालाची विक्री करतात. हा नियम शेतकऱ्यांसाठी मात्र पायदळी तुडवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परंपरागत पिकाला पर्याय म्हणून नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड करण्यात येते. तत्काळ पैसे हातात येतात. या मोहापायी अनेक जण भाजीपाला लावतात, मात्र विक्रीसाठी गेल्यावर हातात पैसे येत नाहीत. उलट खिशातून पैसे जातात. शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात भाजीपाल्याची खरेदी होते आणि ग्राहकांना चढ्या दरात विकून व्यापारी दोन पैसे मिळवितात. या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांची अक्षरश: लूट होते. भाजीपाला दोन पैसे मिळवण्यासाठी लावला असताना खिशातूनच सर्व पैसे जातात. त्यात बदलत्या हवामानाने कीड नियंत्रण करणेही अशक्य होत आहे. व्यापारी नफा ठेवून शेतमालाची विक्री करतात. हा नियम शेतकऱ्यांसाठी मात्र पायदळी तुडवण्यात आला आहे. वाटेल त्या दरात शेतमालाची खरेदी करायची आणि ग्राहकांना नफा ठेवून विक्री करायची, असेच समीकरण आहे.  

शेतकऱ्यांचा खर्चही निघेना... 

यावर्षी मी अडीच एकरमध्ये भाजीपाला लावला होता. वांगे दोन वेळेस जळाले. बरबटी दीड एकरामध्ये लावली आहे. त्याचा तोडण्याचा खर्च ७०० रुपये होता. हातात ५०० रुपयांची पट्टी आली. - प्रवीण ठाकरे

भाजीपाला लावणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. साधा निंदणाचा खर्चही निघत नाही. हातात पाच पैसे पडत नाहीत. एखाद्या वेळेस भाव मिळतो, मात्र बारमाही भाजीपाल्याचे दर पडलेलेच असतात. याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो. - अविनाश तिडके

ग्राहकांना परवडेना 

कोरोनामुळे रोजगार गेला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक पैसा महत्त्वाचा असताना महागड्या दरात भाजीपाला खरेदी करणे परवडत नाही. प्रत्येकांस आहारामध्ये विविध जीवनसत्त्व मिळविण्यासाठी भाजी घ्यावी लागते.        - रोशनी देवकते

मुख्य बाजारपेठेतील शेतमालाचे दर आणि भाजी मंडीतील शेतमालाचे दर यामध्ये दरवेळेस मोठी तफावत पाहायला मिळते. याच प्रमुख कारणाने मोठ्या मंडीतून भाजीपाल्याची खरेदी होते. - प्रियंका वानखडे

भावात एवढा फरक का?भाजीपाल्याची खरेदी करताना त्याची बोली लावली जाते. ही बोली कमीत कमी किती रुपयांची असावी, याबाबत कुठलेही निर्बंध नाहीत. यामुळे व्यापारी वाटेल तितक्या दरापासून खरेदीसाठी सर्रास सुरू करतात. खरेदी झालेला शेतमाल विक्रीसाठी निर्बंध नाही. नफा ठरवून विक्री होते.

 

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या