वणी शहरात रानभाजी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:48 IST2021-08-13T04:48:21+5:302021-08-13T04:48:21+5:30
उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांच्या मार्गदर्शनात या महोत्सवाचे आयोजन केले होते. उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. प्रमुख ...

वणी शहरात रानभाजी महोत्सव
उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांच्या मार्गदर्शनात या महोत्सवाचे आयोजन केले होते. उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती संजय पिंपळशेंडे, जिल्हा परिषद सदस्या मंगला पावडे, बंडू चांदेकर, संघदीप भगत, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, तहसीलदार विवेक पांडे, तालुका कृषी अधिकारी सुशांत माने, गटविकास अधिकारी राजेश गायनर उपस्थित होते. या महोत्सवात केसुर्ली, घोन्सा, मजरा, ढाकोरी, निळापूर, शेलू (खु), मंदर, कोरंबी, रासा, उमरी, बाबापूर, गणेशपूर, वणी येथील शेतकरी व उमेद प्रकल्पातील महिला बचत गटांनी सक्रिय सहभाग घेतला होता. यावेळी कर्टोली, शेवगा फुले, रान तोंडरे, बांबू कोंब, भुईनिंब, अळू, गोपीन, कुंजीर, तरोटा, केणा, घानभाजी, आघाडा, कोंबडा, वाघाटी, अंबाडी, गोपा, राजगिरा, मोठा माठ, कपाळफोळी, घोड, फासवेल, पाथरी, कवठ, चिवड, काठेमाट, उंबर, गुळवेल, खासभाजी, कुळ्याची शेंग, चिंचवट इत्यादी रानभाज्या व रानफळे ठेवण्यात आली होती. यासाठी तालुका कृषी अधिकारी सुशांत माने, मंडळ कृषी अधिकारी आनंद बदखल, पवन कावरे, समीक्षा वानखडे, धम्मपाल बन्सोड, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक व शेतकऱ्यांनी सहकार्य केले.