सखी मंचच्या विविध स्पर्धा उत्साहात

By Admin | Updated: June 20, 2015 00:16 IST2015-06-20T00:16:43+5:302015-06-20T00:16:43+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील महिलांना स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त ....

In the various rituals of the Sakhi Forum | सखी मंचच्या विविध स्पर्धा उत्साहात

सखी मंचच्या विविध स्पर्धा उत्साहात

ज्योत्स्ना दर्डा जन्मदिन : महिलांच्या कलागुणांना मिळाली चालना
यवतमाळ : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील महिलांना स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त लोकमत सखी मंचच्यावतीने येथील दर्डा मातोश्री सभागृहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित आपल्या कलागुणांना चालना दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सखी मंचची प्रार्थना छाया राठोड यांनी घेतली. तसेच सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांचे स्वागत अलका राऊत यांनी केले.
भाषण स्पर्धेत सखींनी ‘आधुनिकतेचा वाढता स्वैराचार’ या विषयावर आपली परखड मते सादर केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्योत्स्ना मुकडे यांनी तर द्वितीय क्रमांक दीपा जगताप यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून प्रा. काशीनाथ लाहोरे यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत वंदना मोगरकर यांनी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. रांगोळी स्पर्धेत सखींनी सुरेख रांगोळी साकारुन कलात्मकतेचे दर्शन घडविले. यात प्रथम क्रमांक अपर्णा सज्जनकर तर द्वितीय क्रमांक मृण्मयी चौधरी यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून चित्रकार रणजित वनकर यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत सुनीता दर्डा यांनी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले.
केक सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक एकता नंदूरकर यांनी तर द्वितीय क्रमांक अनिता येंडे यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून ईशा राठी यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत माला टाके यांनी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. दिया सजाओ या स्पर्धेत सखींनी दिव्यांची सुरेख आरास केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पूजा तिवारी यांनी तर द्वितीय क्रमांक कविता लढ्ढा यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून स्मीता मोर यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत सुनीता भोयर यांनी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. बालविकास मंचच्या सदस्यांसाठी भुले बिसरे गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चिमुकल्यांनी एका पेक्षा एक सुरेख गाणी सादर केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शुभलक्ष्मी कुलकर्णी हिने तर द्वितीय क्रमांक युक्ता बेहरे यांनी पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून वैशाली वाटकर, महेश शिरे, अपर्णा शेलार यांनी काम पाहिले. त्यांचे स्वागत विद्या बेहरे, उषा खटे यांनी स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन केले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाची विजेती शुभलक्ष्मी कुलकर्णी हिने ज्योत्स्ना दर्डा यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित स्मृतीरंग कार्यक्रमात गीत सादर करून तेथेही श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्मृतीरंग कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले. (उपक्रम प्रतिनिधी)

सखींनी योग दिनात सहभागी होण्याचे आवाहन
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन २१ जून रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमात सखी मंचच्या आतापर्यंतच्या सर्व सदस्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यवतमाळच्या ओम कॉलनी स्थित प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय येथे २१ जून रोजी सायंकाळी ५ ते ६ वेळात योग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात सखी मंचच्या आतापर्यंतच्या सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे.

Web Title: In the various rituals of the Sakhi Forum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.