शिक्षकांचे विविध प्रश्न सभापतींच्या दरबारात

By Admin | Updated: March 15, 2015 00:29 IST2015-03-15T00:29:42+5:302015-03-15T00:29:42+5:30

घाटंजी, वणी, झरी, पांढरकवडा आणि आर्णी तालुक्यातील नव्याने सहाय्यक शिक्षक झालेल्यांना एकस्तर वेतनश्रेणी मंजूर करावी,

Various questions of teachers | शिक्षकांचे विविध प्रश्न सभापतींच्या दरबारात

शिक्षकांचे विविध प्रश्न सभापतींच्या दरबारात

घाटंजी : घाटंजी, वणी, झरी, पांढरकवडा आणि आर्णी तालुक्यातील नव्याने सहाय्यक शिक्षक झालेल्यांना एकस्तर वेतनश्रेणी मंजूर करावी, अशी मागणी शिक्षक संघाच्या घाटंजी शाखा शिष्टमंडळाने जिल्हा परिषद शिक्षण सभापतींकडे केली आहे.
यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सभापती नरेंद्र ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी १ मार्चपासून शाळा सकाळ पाळीत सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देत प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर राऊत आणि संचालक शेख लुकमान यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी इतर जिल्ह्यात नक्षलग्रस्त भत्ता तसेच वेतनश्रेणी नवीन शिक्षकांना सुरू असल्याची बाब पुराव्यासह सभापतींपुढे मांडण्यात आली. यासंदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन सभापतींनी शिष्टमंडळाला दिले. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजूदास जाधव यांच्या मार्गदर्शनात सभापतींची भेट घेण्यात आली.
यावेळी दीपक चौधरी, मुकेश भोयर, मदन पराते, आसाराम चव्हाण, संजय तुरक, विशाल गोडे, पुरुषोत्तम चांदेकर, अतुल वानखडे, अमोल चौधरी, प्रवीण आवारी, संदीप लोहकरे, विनोद ढाले, पवन निबुदे, प्रदीप जाधव, अमीत वानखडे, दिनेश सोनवणे, अमीत खडसे, दिलीप राठोड, पेटेवार, कानिंदे, शमशोद्दीन भाटी, भास्कर डहाके, अमीन शेख, नागेश्वर वाघमारे, विश्वनाथ कामनवार, संदीप केमेकार, गजानन अंकतवार, नितीन पारखी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Various questions of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.