गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

By Admin | Updated: March 1, 2016 02:05 IST2016-03-01T02:05:57+5:302016-03-01T02:05:57+5:30

गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मंदिरांमध्ये भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

Various programs on the occasion of Gajanan Maharaj revealed | गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

यवतमाळ : गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मंदिरांमध्ये भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
दारव्हा मार्गावरील कोल्हे ले-आउटमधील त्रिमूर्ती सोसायटीत प्रगटदिन महोत्सवाचे आयोेजन करण्यात आले आहे. २३ ते २९ फेब्रुवारीपर्यंत मोहन महाराज कठाळे यांच्या वाणीतून भागवतकथेचे आयोजन करण्यात आले होते. भागवत कथेचे श्रवण करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती नोंदविली होती. मंगळवारी सकाळी ६ वाजता अभिषेक आणि होमपूजन होणार आहे. तर ९.३० वाजता ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक निघणार आहे. १ वाजता ह.भ.प सदानंद देशपांडे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ७.१५ वाजता महाआरती, ७.३० ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन महाराज विश्वस्त मंडळ झटत आहे.
प्रतिशेगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशनगरातील संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ फेब्रुवारीपासून प्रगटदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. ‘श्रीं’च्या विजयग्रंथाचे पारायण, गायत्री दीपयज्ञ, संगीतमय विठ्ठल नामजप, कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. १ मार्चला पंचकुंडी गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ वाजता काल्याचे कीर्तन, १ ते ५ पर्यंत महाप्रसाद आणि आरतीनंतर विशेष सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत गजानन महाराज समिती परिश्रम घेत आहे.
स्थानिक सिंघानियानगरातील गजानन महाराज मंदिर संस्थानात संत गजानन महाराज प्रगट दिनोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, १ मार्च रोजी सकाळी १० वाजता हभप विठ्ठलराव खानझोडे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ ते ४ या वेळात महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Various programs on the occasion of Gajanan Maharaj revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.