मातोश्री विद्यालयात विविध कार्यक्रम
By Admin | Updated: October 21, 2015 02:47 IST2015-10-21T02:47:49+5:302015-10-21T02:47:49+5:30
येथील मातोश्री विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हात धुवा दिन व चित्रकला स्पर्धा आणि वाचन दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

मातोश्री विद्यालयात विविध कार्यक्रम
महागाव : येथील मातोश्री विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हात धुवा दिन व चित्रकला स्पर्धा आणि वाचन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना हात धुण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाणी संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करून माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दूल कलाम यांच्या साहित्याचा परिचय करून दिला. यावेळी प्राथमिक मधून अनिकेत भारती, प्रिया जयस्वाल, श्रीकांत कुबडे, प्रशांती नरवाडे, ओंकार साळवे, सुप्रिया नरवाडे, मानव कऱ्हाळे, आर्यन पद्मावार, रुपाली कदम, अंकिता राठोड, दिव्या कदम, उमेश पवार, वैष्णवी राठोड, प्रशांत राऊत यांनी तर माध्यमिक मधून साक्षी पांडे, श्रद्धा भवानकर, श्रृतिका नरवाडे, वैशाली चव्हाण, प्रणय पवार, कृष्णकांत शिंदे, भालचंद्र तळणकर, विश्वजित इंगोले, श्रीपाद राऊत यांनी भाग घेतला. कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संचालन प्रतिक्षा श्रृंगारे हिने तर आभार श्रावणी व्यवहारे हिने मानले.