वऱ्हाडाचा मेटॅडोअर उलटून २० जखमी

By Admin | Updated: May 21, 2015 00:14 IST2015-05-21T00:14:26+5:302015-05-21T00:14:26+5:30

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा भरधाव मेटॅडोअर उलटून झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले.

Varadha metadair overturned and 20 injured | वऱ्हाडाचा मेटॅडोअर उलटून २० जखमी

वऱ्हाडाचा मेटॅडोअर उलटून २० जखमी

पळशीची घटना : चौघांची प्रकृती गंभीर
पोफाळी : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा भरधाव मेटॅडोअर उलटून झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. हा अपघात उमरखेड तालुक्यातील पळशी फाट्यावर बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सलमान शेख पाशा (१६), शेख अशपाक शेख पाशा (१८), राहुल टोपाजी टोपरे (२२), शेख मोबीन शेख (१८) असे गंभीर जखमींची नावे आहेत. हातगाव येथील लग्नाचे वऱ्हाड घेऊन मेटॅडोअर एम.एच.२९-६७७८ पोफाळी कारखाना येथे जात होता. पळशी फाट्याजवळ सकाळी १० वाजता चालकाचे नियंत्रण गेल्याने मेटॅडोअर उलटला. एकच हल्लाकल्लोळ झाला अनेकांना जबर मार लागला. गावकऱ्यांनी जखमी वऱ्हाड्यांना तत्काळ बाहेर काढून खासगी वाहनांनी उपचारासाठी हातगावकडे रवाना केले. १५ ते १६ वऱ्हाड्यांना हातगावच्या रुग्णालयात तर चार गंभीर जखमींना उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने नांदेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. हदगाव येथे दाखल करण्यात आलेल्या जखमींची नावे मात्र कळू शकले नाही. तसेच वृत्तलिहेस्तोवर पोलिसात तक्रारही देण्यात आली नव्हती. या मेटॅडोअरमध्ये नेमके किती वऱ्हाडी प्रवास करीत होते, हेही कळू शकले नाही. (वार्ताहर)

Web Title: Varadha metadair overturned and 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.