शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पैनगंगेतील चोरटा कोळसा शिरपूरमार्गे वणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदानीतून चोरट्या मार्गाने निघणारा शेकडो टन कोळसा शिरपूरमार्गे वणीत दाखल होतो. तेथून या कोळशाची विल्हेवाट लावली जाते.वणीमध्ये कोळशाची मोठी उलाढाल आहे. अनेक राजकीय पक्षांची दुकानदारीच या कोळशावर चालते. त्यातून मिळणारा पैसा राजकारणात वापरला जातो. आजही अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे कोेळशात हात गुंतलेले ...

ठळक मुद्देलाल पुलियावर विल्हेवाट : तीन पोलीस ठाण्यांची मेहरनजर, कोळशातील ‘दुकानदारी’मुळे राजकीय पक्ष गप्प

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पैनगंगा खदानीतून चोरट्या मार्गाने निघणारा शेकडो टन कोळसा शिरपूरमार्गे वणीत दाखल होतो. तेथून या कोळशाची विल्हेवाट लावली जाते.वणीमध्ये कोळशाची मोठी उलाढाल आहे. अनेक राजकीय पक्षांची दुकानदारीच या कोळशावर चालते. त्यातून मिळणारा पैसा राजकारणात वापरला जातो. आजही अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे कोेळशात हात गुंतलेले आहेत. त्यामुळेच कुणी या कोळशाविरोधात दीर्घकाळ व आक्रमक आंदोलन केल्याचे ऐकिवात नाही. एखादवेळी ते केले तरी केवळ देखावा म्हणून असते. राजकीय पटलावरून कोणतीच ओरड नसल्याने कोळशाचा हा चोरटा व्यापार राजरोसपणे सुरू आहे. त्याला पोलीस व प्रशासनाचेही पाठबळ लाभते. वणी तर चक्क एक पोलीस कर्मचारीच कोळशाच्या या व्यवहारात जणू भागीदार असल्याचे बोलले जाते. कुणाचेही कोळशाचे ट्रक पोलीस कारवाईत ‘अडकू’नये म्हणून हा कर्मचारी खास खबरदारी घेतो. मध्यंतरी स्थानिक गुन्हे शाखेने कोळशाचे दोन ट्रक वणीत पकडले होते. त्यावेळी या कर्मचाºयाने चक्क एलसीबीसोबत वाद घालण्याची हिंमत केली. यावरून या व्यवसायातील त्याची ‘ताकद’ किती हे स्पष्ट होते.वणी-चंद्रपुरातील खाणींमधून चोरट्या मार्गाने कोळसा बाहेर काढला जातो. त्यात सर्वाधिक कोळसा हा गडचांदूरच्या पैनगंगा खदानीतून काढला जात असल्याचे सांगितले जाते. दररोज किमान दहा ते १५ हायवा ट्रकच्या माध्यमातून शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हा कोळसा वणीत लालपुलियावर आणला जातो.वणी रेल्वे साईडींगच्या नावाने निघणारा हा कोळसा प्रत्यक्षात लालपुलियावरील अण्णा ब्लॅक मार्केटमध्ये उतरवितो. तेथील भाड्याने घेतलेल्या काही भूखंडावर हा व्यवहार चालतो. खदानीतून दोन रुपये किलोचा निकृष्ट दर्जाचा कोळसा एक नंबरमध्ये एखाद दोन ट्रक घेतला जातो. नंतर याच बिल्टीवर चोरट्या मार्गाने आलेल्या कोळशाची विल्हेवाट लावली जाते. हा कोळसा मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑ व अन्य भागात विटभट्टी, छोट्या प्रकल्पांसाठी विकला जातो.रेल्वे साईडींगसाठी निघणारा हा कोळसा गडचांदूर, शिरपूर, वणी पोलिसांच्या नाकावर टिच्चून लालपुलियाच्या काळ्याबाजारात उतरविला जातो. या व्यवसायात चंद्रपूर जिल्ह्यातील असलम, बडता, हाजी, बाबा हे मास्टर मार्इंड ओळखले जातात. त्यांना त्या पोलीस कर्मचाºयाची मोलाची साथ लाभते. भाड्याने दिलेल्या भूखंडावरून चालणाऱ्या या कोळशाच्या व्यवहारापासून कुणीच अनभिज्ञ नाही. परवाना असला तरी गैरप्रकारात आपले नाव येऊ देऊ नये, एवढीच भूखंड मालकांची अट असते. दरदिवशी दहा ते १५ ट्रक कोळशाच्या या उलाढालीत ही चोरी रोखण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेतील कुण्या घटकाला त्याच्या दर्जानुसार किती मोठा लाभ मिळत असेल याचा सहज अंदाज येतो. कोळशाच्या व्यवहारातील असे अनेक कारनामे पुढे आले आहेत.दोन रुपये किलोचा निकृष्ट कोळसा एक नंबरमध्ये विकत घेऊन प्रत्यक्षात त्या बिल्टीवर चोरट्या मार्गाने आलेला चांगल्या दर्जाचा कोळसा पुढे पाठविण्याचे हे प्रकार कोल इंडिया, महसूल प्रशासन, आरटीओ व पोलीस प्रशासनासाठी खुले आव्हान ठरले आहे. या व्यवसायाला राजकीय आशीर्वाद लाभल्यानेच कदाचित प्रशासन आक्रमक भूमिका न घेता ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करीत असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे.दररोज १५ ट्रक चोरट्या कोळशाचे पासिंगसात वेगवेगळ्या क्रमांकाच्या वाहनातून कोळशाची विल्हेवाटट्रक ‘अडकू’नये म्हणून भागीदार पोलीस कर्मचाºयाची धावपळआरटीओकडून केवळ ओव्हरलोडची तपासणीबिल्टी निकृष्ट कोळशाची, पुरवठा चांगल्या कोळशाचाबोगस बिल्टीचा वापर ४मास्टर मार्इंड चंद्रपूर जिल्ह्यातलालपुलियाचा म्होरक्या ‘अण्णा’

टॅग्स :Crimeगुन्हा