विटभट्टीवर आडजात लाकडाचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:12+5:30
वीटभट्टीधारकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. मात्र वन व महसूल प्रशासन चुप्पी साधून आहे. काळी दौ. वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वीट भट्टीधारक आडजात लाकडाचा वापर करीत आहे. त्यात रोहडा, कडूनिंब यासारख्या विविध जातींच्या वृक्षांची कत्तल होत आहे. वीटा भाजण्यासाठी आडजात लाकडाचा वापर होत असताना वन विभाग व महसूल यंत्रणा गप्प आहे. यामुळे मो्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

विटभट्टीवर आडजात लाकडाचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील हाय-वे रस्त्यालगत गुंज, महागाव, हिवरा, काळी दौ. परिसरात वीट भट्ट्या सुरू झाल्या. वीट भाजण्यासाठी आडजात लाकडाचा व मिठाचा वापर होत असताना प्रशासकीय यंत्रणा चुप्पी साधून आहे.
वीटभट्टीधारकांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. मात्र वन व महसूल प्रशासन चुप्पी साधून आहे. काळी दौ. वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वीट भट्टीधारक आडजात लाकडाचा वापर करीत आहे. त्यात रोहडा, कडूनिंब यासारख्या विविध जातींच्या वृक्षांची कत्तल होत आहे. वीटा भाजण्यासाठी आडजात लाकडाचा वापर होत असताना वन विभाग व महसूल यंत्रणा गप्प आहे. यामुळे मो्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
काहींना वीट भट्टीसाठी शासनाने ५00 ब्रासची रॉयल्टी माफ केली आहे. मात्र वीट भट्टी सुरू करण्याच्या नियमांची अनेक ठिकाणी पायमल्ली केली जात आहे. हाय-वेपासून २00 मीटरचे अंतर न ठेवता रस्त्यालगतच दुकानदारी थाटली आहे. त्यामुळे वीट कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. काही वीट कारखान्याला लागणाºया पाण्यासाठी चक्क रस्ता फोडून पाईपलाईन टाकली. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागही मूग गिळून आहे.
वीट कारखान्यासाठी जंगलात शिरकाव कारण्याऱ्यांवर कारवाई केली जाईल. लाकडाबाबत चौकशी करू. अवैध वृक्ष कत्तल करणाºयांना कारवाईचा हिसका दाखवू.
- जी.एन. शिंगणकर,
राउंड आॅफिसर, गुंज ता.महागाव