शिवरायांच्या पुतळ््याचे अनावरण
By Admin | Updated: December 26, 2016 01:46 IST2016-12-26T01:46:38+5:302016-12-26T01:46:38+5:30
शहरातील नाट्यगृह परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ््याचे रविवारी सकाळी अनावरण करण्यात आले.

शिवरायांच्या पुतळ््याचे अनावरण
यवतमाळ : शहरातील नाट्यगृह परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ््याचे रविवारी सकाळी अनावरण करण्यात आले. वर्षभरात पुतळा उभारणीचे काम पूर्णत्वास गेले. मात्र पुतळा स्मारक परिसरात किरकोळ कामे होणे बाकी आहे.
पुतळा अनावरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष राय होते. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, नगरपरिषद उपाध्यक्ष मनीष दुबे, मुख्याधिकारी सुदाम धुपे, सभापती शैलेंद्र दालवाला आदी यावेळी उपस्थित होते. पुतळा अनावरण प्रसंगी मान्यवरांनी यवतमाळकरांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले. लवकरच लगतच्या नाट्यगृहाचेही काम पूर्ण करून मार्च महिन्यात त्याचेही लोकार्पण केले जाईल, असे सुतोवाच राज्यमंत्री मदन येरावार यांनी केले.
छत्रपतींच्या पुतळ््यामुळे शहरातील लोकांना सकारात्मक प्रेरणा मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी छत्रपतींच्या पुतळ््याची निमिर्ती करणारे अमरावती येथील गणिती कला केंद्राचे विश्वजीत सातारकर आणि परिसर सौंदर्यीकरणाचे काम करणारे कंत्राटदार नितीन धोटे यांचा पाहुण्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील गणमान्य व्यक्तींसह नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी क्रेनमध्ये बसून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. (कार्यालय प्रतिनिधी)