शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:33 IST

कापूस, मूग, उडीद, ज्वारीच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह : मराठवाड्यात धुवांधार, विदर्भ माघारला

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बदलत्या हवामानाचा परिणाम थेट मान्सूनवर झाला आहे. वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने काही भागाला झोडपून काढले, तर राज्यातील काही भाग अजूनही कोरडाच ठेवला. यामुळे जूनअखेरपर्यंत राज्यात केवळ २२ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहे. दरवर्षी मराठवाड्याला पावसाची वाट पाहावी लागायची. यावर्षी विदर्भातील जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यातून कापूस, मूग, उडीद, ज्वारीचे क्षेत्र घटण्याचा धोका वाढला आहे.

संपूर्ण राज्यात एक कोटी ४० लाख हेक्टरवर खरिप पेरण्या होतात. यातील निम्मे अधिक क्षेत्र जूनपर्यंत पेरणीखाली येते. यावर्षी संपूर्ण राज्यात केवळ २२ लाख हेक्टरवर खरिप पेरण्या झाल्या आहेत. त्यात मराठवाड्याचे क्षेत्र जास्त आणि विदर्भाचे क्षेत्र जेमतेम आहे. गत १० वर्षांचा अभ्यास केला तर पेरणी होण्याचा कालावधी लांबत चालला आहे. सोबतच परतीचा पाऊस वाढत चालला आहे. यावर मात करण्यासाठी बियाण्यामध्ये संशोधन होणे गरजचे आहे.

विदर्भातील कापसाचा पेरा घटण्याचा धोकापहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली, तर दुसरीकडे विदर्भात १५ ते २० जूनपर्यंत पावसाने ओढ दिली. यानंतर पाऊस पुन्हा थांबला आहे. यात कापूस लागवडीचा कालावधी २० जूनपर्यंत योग्य होता. विदर्भात सर्वाधिक १२ ते १५ लाख हेक्टरवर कापूस होतो. यावर्षी विदर्भात पाऊस लांबल्याने कापसाचा पेरा घटण्याचा धोका आहे.

मूग, उडीद लागवडीचा कालावधी उलटून गेलामूग आणि उडीद लागवडीचा कालावधी संपला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पेरणी न जमल्यामुळे. मूग, उडदाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.

हवामान बदलाने हे घडत आहे. या वर्षी विदर्भात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे. धानाच्या पेरण्या जुलैमध्ये होतील, अशी स्थिती आहे, तर मराठवाड्यात पूर येत आहेत.सुरेश चोपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :yavatmal-acयवतमाळfarmingशेतीFarmerशेतकरी