दारूबंदीसाठी एकजूट :

By Admin | Updated: March 25, 2015 00:00 IST2015-03-25T00:00:51+5:302015-03-25T00:00:51+5:30

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील मध्यवस्तीत असलेले दारूचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी झाडगाव येथील ३०० महिला मंगळवारी राळेगाव तहसील आणि पोलीस ठाण्यावर धडकल्या. ...

United States | दारूबंदीसाठी एकजूट :

दारूबंदीसाठी एकजूट :

राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील मध्यवस्तीत असलेले दारूचे दुकान बंद करावे, या मागणीसाठी झाडगाव येथील ३०० महिला मंगळवारी राळेगाव तहसील आणि पोलीस ठाण्यावर धडकल्या. यापूर्वी या महिलांनी ग्रामपंचायतीसमोर धरणे दिले. दरम्यान बुधवारी ग्रामपंचायतीने महिलांची विशेष सभा घेऊन गावातील दारू दुकान बंद करण्याचा एकमुखाने ठराव घेतला. ग्रामपंचायत ठरावाची प्रत घेऊन महिला तहसील कार्यालय आणि राळेगाव ठाण्यात पोहोचल्या. या ठरावाची प्रत संबंधितांना देऊन दारूचे दुकान बंद करण्यासंबंधी कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाचा महिलांनी जल्लोष केला. मात्र आता तहसील प्रशासन काय भूमिका घेते याकडे या महिलांचे लक्ष लागले आहे.

Web Title: United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.