स्वच्छतेसाठी एकवटले उमरखेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:18 IST2017-12-10T01:18:17+5:302017-12-10T01:18:28+5:30

स्वच्छतेचा ध्यास घेत नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरूवारी शहरातून स्वच्छता रॅली काढली. नगरपरिषदेने रॅलीसाठी पुढाकार घेतला. स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत शहरात स्वच्छतेचा संदेश देत ही रॅली निघाली.

Unite to cleanliness | स्वच्छतेसाठी एकवटले उमरखेडकर

स्वच्छतेसाठी एकवटले उमरखेडकर

ठळक मुद्देस्वच्छता महारॅली : नागरिक, विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : स्वच्छतेचा ध्यास घेत नागरिक, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरूवारी शहरातून स्वच्छता रॅली काढली. नगरपरिषदेने रॅलीसाठी पुढाकार घेतला.
स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत शहरात स्वच्छतेचा संदेश देत ही रॅली निघाली. रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी नागरिकांना आपल्या घरातील ओला व सुका कचरा कसा वेगळा ठेवावा, जमा झालेल्या कचºयाचे कंपोस्ट खत कसे तयार करावे, आपला परिसर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनी काय करावे, आदी संदेश दिले. नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करून ‘स्वच्छ उमरखेड-सुंदर उमरखेड’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, याकरिता शहरातील मूख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडाणिस यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी तहसीलदार भगवान कांबळे, नगराध्यक्ष नामदेव ससाणे, उपाध्यक्ष अरविंद भोयर, मुख्याधिकारी गणेश चव्हाण, ठाणेदार हनुमंत गायकवाड, नगरसेवक नितीन भुतडा, प्रकाश दूधवार, संदीप ठाकरे, गजानन ठाकरे, कविता खंदारे, अनुप्रिता देव, बाळासाहेब नाईक यांच्यासह ब्रॅन्ड अंबेसेडर जयशंकर जवणे, दीपक ठाकरे, व्यंकटेश पेंशनवार उपस्थित होते.
सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येत रॅलीतून स्वच्छतेचा संदेश दिला. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होते. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पथनाट्यातून स्वच्छतेचा संदेश दिला .

Web Title: Unite to cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.