अक्षम्य! चिमुकल्यांना पोलिओ डोजऐवजी पाजले सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 01:52 PM2021-02-01T13:52:49+5:302021-02-01T14:28:36+5:30

Yawatmal news घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयाच्या पोलिओ केंद्रावर रविवारी पोलिओ डोज पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. एक नव्हे तब्बल १२ मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला.

Unforgivable! Chimukalyan was given a sanitizer instead of a polio dose | अक्षम्य! चिमुकल्यांना पोलिओ डोजऐवजी पाजले सॅनिटायझर

अक्षम्य! चिमुकल्यांना पोलिओ डोजऐवजी पाजले सॅनिटायझर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ: घाटंजी तालुक्यातील भांबोर येथे शासकीय रुग्णालयाच्या पोलिओ केंद्रावर रविवारी पोलिओ डोज पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर देण्यात आले. एक नव्हे तब्बल १२ मुलांना सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. याची चौकशी सुरू असून प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले आहे.
 सकाळी 10 वाजता कापसी येथे पोलिओ लसीकरणा चा कार्यक्रम भांबोरा Psc  मार्फत राबविण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे गावातील 12 मुलांना पोलिओ च्या जागी सॅनिटाइजर पाजण्यात आले. काही तासा नंतर 3 ते 4 मुलांना उलट्या  झाल्या. तसेच ताबडतोब सर्व मुलांना यवतमाळ येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हि घटना माहित होताच  एम.डी. सिंह  कलेक्टर साहेब यांनी रात्री 12 वाजता येऊन सर्व  रुग्णाना भेट दिली.
यासंदर्भात कापसीचे सरपंच युवराज मरापे यांनी प्रतिक्रिया दिली असून, दोषींवर कारवाई केली जावी अशी पालकांची मागणी असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Unforgivable! Chimukalyan was given a sanitizer instead of a polio dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य