दिग्रस तहसीलवर बेरोजगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:53 IST2018-02-22T21:53:23+5:302018-02-22T21:53:52+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी गुरुवारी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

दिग्रस तहसीलवर बेरोजगारांचा मोर्चा
ऑनलाईन लोकमत
दिग्रस : आपल्या विविध मागण्यांसाठी शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी गुरुवारी येथील तहसील कार्यालयावर धडक दिली. तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
येथील मानोरा चौकातून सकाळी ११ वाजता शेकडो बेरोजगार तरुण-तरुणी हातात फलक घेऊन मोर्चाद्वारे धडकले ‘माय-बाप म्हणते शाळा शिक, शासन म्हणते पकोडे विक’, ‘रोजगार वाढवा, युवक घडवा, नको गोंधळ, नको राडा, आता फक्त जागा काढा’ असे फलक सर्वांचे लक्ष वेधत होते. तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर गौतम तुपसुंदरे, भाऊ देशमुख, भाऊ काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यात नोकर भरती सुरु करावी, पोलीस भरती पदे वाढवावी, तलाठी पद भरती घ्यावी, शासकीय कार्यालयातील अनुशेष भरून काढावा, आॅन लाईन परीक्षा रद्द करावी, विदर्भातील लोकसंख्येच्या २३ टक्के जागा भराव्यात असे निवेदन देण्यात आले. यावेळी केतन रत्नपारखीसह शेकडो तरूण उपस्थित होते.