बेरोजगारांची कचेरीवर धडक
By Admin | Updated: November 24, 2014 23:06 IST2014-11-24T23:06:23+5:302014-11-24T23:06:23+5:30
जिल्हा निवड समितीकडून जिल्हा परिषदेतील विविध संवर्गासाठी पदभरती केली जात आहे. या प्रक्रियेत लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची घटना सलग दोन वेळा घडली आहे. यामुळे संतापलेल्या

बेरोजगारांची कचेरीवर धडक
यवतमाळ : जिल्हा निवड समितीकडून जिल्हा परिषदेतील विविध संवर्गासाठी पदभरती केली जात आहे. या प्रक्रियेत लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची घटना सलग दोन वेळा घडली आहे. यामुळे संतापलेल्या सुशिक्षित बेरोजगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्या नेतृत्वात येथील दाते कॉलेज चौकातून निघालेला मोर्चा आर्णी मार्गावरून बसस्थानक चौकात दाखल झाला. काही वेळ बसस्थानक चौकात त्यांनी निदर्शने केली. तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचा अनागोंदी कारभार आणि जिल्हा निवड समितीच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी राजेश खवले यांंना सादर केले. हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पाठविण्यात यावे आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या मोर्चात प्रशांत कवस, अमित ठाकरे, राहुल मेश्राम, उमेश चव्हाण, गोपाल पेनोरे, दत्तात्रय येनगंदेवार, ज्ञानेश्वर मॅकलवार, मंगेश सोनवणे, अमित पोनजवार, मयूर चंद्रे, श्रीनिवास हंसकार, नितेश राठोड, मनोज पन्नासे, योगेश धानोरकर आदी सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)