अनियंत्रित ट्रक घरात शिरला

By Admin | Updated: August 13, 2015 03:05 IST2015-08-13T03:05:41+5:302015-08-13T03:05:41+5:30

लोहारा येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ बुधवारी रात्री अनियंत्रित कंटेनर घरात शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.

The unchecked truck entered the house | अनियंत्रित ट्रक घरात शिरला

अनियंत्रित ट्रक घरात शिरला

ट्रक घरात शिरला : यवतमाळनजीकच्या लोहारा येथील रस्त्यालगतच्या घरात सिमेंट भरलेला भरधाव ट्रक मध्यरात्रीच्या सुमारास शिरला. यामध्ये घर उद्ध्वस्त झाले. सुदैवाने प्राणहानी टळली.
यवतमाळ : लोहारा येथे रेल्वे क्रॉसिंगजवळ बुधवारी रात्री अनियंत्रित कंटेनर घरात शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. चालक मद्य प्राशन करून होता, असे पोेलिसांनी सांगितले.
चंद्रपूर येथील अमरदीप ट्रान्सपोर्टचा आणि दीपक जयस्वाल यांच्या मालकीचा एमएच४० वाय९९१६ हा कंटेनर सिमेंटचे पोते घेऊन चंद्रपूरहून अमरावतीला जात होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक विक्की सुराशे यांच्या घरात शिरला. घराच्या अंगणात असलेल्या झाडाला ट्रक अडला. परंतु रस्त्यावरील दोन दुचाकी, टाटा एस या वाहनांसह एक पानठेला, त्यातील काँम्प्रेसर मशीन आणि डिजे आदी साहित्यांचा चुराडा केला. यात सात लाख ९५ हजारांचे नुकसान झाले.

Web Title: The unchecked truck entered the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.